ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 7 - महाबळेश्वरपेक्षाही कमी किमान तापमानाची नोंद सातत्याने पुन्हा नाशिकला झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमान (१०.५) नाशिकला नोंदविले गेले होते. सोमवारी (दि.७) नाशिकचा पारा गेल्या आठवड्यापेक्षाही अधिक घसरून थेट १०.२ अंशावर आला. यामुळे नाशिक राज्यातील सर्वाधिक थंडी असलेले शहर बनल्याचे पुणे येथील हवामान शास्त्र विभागाने जाहीर केले आहे. जिल्ह्यातील निफाड तालुका सध्या गारठला असून, या ठिकाणी किमान तापमान ९ अंश इतके नोंदविण्यात आले.गेल्या आठवड्यापासून नाशिक अधिकच थंड होत असून, यावर्षी नाशिककरांना थंडीचा तीव्र कडाका सहन करावा लागणार आहे. हंगामातील सर्वाधिक नीचांकी तापमान गेल्या बुधवारनंतर सोमवारी नोंदवले गेले.
https://www.dailymotion.com/video/x844h6k