शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

VIDEO- धोडप किल्ल्याच्या कुशीत साहसी क्रीडाप्रकारांचे 'न्यू डेस्टिनेशन'

By admin | Published: January 02, 2017 7:44 PM

अझहर शेख/आॅनलाइन लोकमत, नाशिक, दि. 2 - गडकोट, निसर्ग आणि कॅम्पसाईटची वारी...निर्णयक्षमता जिद्द आणि साहसासाठी भारी... चला तर मग ...

अझहर शेख/आॅनलाइन लोकमत,नाशिक, दि. 2 - गडकोट, निसर्ग आणि कॅम्पसाईटची वारी...निर्णयक्षमता जिद्द आणि साहसासाठी भारी... चला तर मग करू या विकेण्ड प्लान जिल्ह्याचा मध्यबिंदू असलेला तसेच सातवाहन काळापासून तर इंग्रजांपर्यंत अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार म्हणून मिरवणाऱ्या सातमाळा पर्वतराजीमधील सर्वात उंच अशा धोडपच्या कुशीत. नाशिकच्या वनविभागाने (पूर्व) धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी गावालगत उभारलेले निसर्ग पर्यटन केंद्र निसर्गप्रेमी पर्यटकांना खुणावत आहे. चांदवड तालुक्यातील हट्टी गावामधील गावकऱ्यांच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सहकार्याने वनविभागाने ग्राम विकास व  जिल्हा नियोजन विकास व बिगर आदिवासी योजनेअंतर्गत २०१५च्या डिसेंबर अखेरपासून निसर्ग पर्यटन व साहसी क्रीडा पार्क उभारणीचा प्रकल्प हाती घेतला. वर्षभरात हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. शासनाच्या वन पर्यटन धोरणांतर्गत शहरातील नागरिकांना दुर्ग, गड, किल्ले, वन्यजीव, निसर्गाची जैवविविधता माहिती व्हावी, यासाठी वनविभागाने शासनाच्या मार्गदर्शनानुसार इको टुरिझम संकल्पनेच्या वाटेवर दमदार पाऊल ठेवले आहे. याचा प्रत्यय हट्टी येथील निसर्ग पर्यटन केंद्राला दिलेल्या भेटीत आला. हट्टी गावातील गावकऱ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि गावाचा विकास साधला जावा, तसेच गावाच्या परिघामध्ये असलेल्या वनसंपदेचे संरक्षण व्हावे, या मुख्य उद्देशाने वनविभागाने सुमारे सात एकर क्षेत्रावर २०१५ साली डिसेंबरपासून विविध विकासकामांना सुरुवात केली आहे. पॅगोडा, अंतर्गत निसर्ग पायवाटा, वाहनतळ, पार बांधणी, निरीक्षण मनोरे, ओटे, बाक अशी कामे पहिल्या टप्प्यात झाली. दुसऱ्या टप्प्यात २०१६च्या वर्षअखेरपर्यंत हे निसर्ग पर्यटन केंद्र पर्यटकांसाठी पूर्णपणे वनविभागाने सज्ज केले आहे. सध्या सर्वच प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पर्यटकांमधील नाराजीचा सूर कमी होण्यास मदत होणार आहे. आकर्षक निसर्ग परिचय केंद्र, डॉरमेटरी निवास व्यवस्था, उपाहारगृह, किल्ल्यावर जाण्यासाठीच्या पायवाटा, खोदतळे, वाहनतळ या प्राथमिक सुविधांची जोड येथील अ‍ॅडव्हेंचर पार्कला देण्यात वनविभागाला यश आले आहे. यामुळे पर्यटकांचा ओघ या नव्या डेस्टिनेशनकडे वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास उपवनसंरक्षक एन. रामानुजम यांनी भेटीदरम्यान व्यक्त केला.कसे पोहोचाल...मुंबई आग्रा महामार्गाने नाशिकपासून ६० किलोमीटर वडाळीभोई गावापासून उजवीकडे वळण घेत धोडंबे गाव (५.किमी) धोडंबे ते हट्टी गाव पाच किलोमीटरमुंबई ते हट्टी २४० किलोमीटरजवळचे रेल्वेस्थानकमनमाड, नाशिकरोडनिवास व्यवस्था४० पर्यटकांसाठी वनविभागाची डॉरमेटरी हॉल.प्रवेश शुल्क ५० रुपये (प्रति व्यक्ती)भोजनशुल्क १६० रुपये (प्रति व्यक्ती, नाश्ता, जेवण)साहसी क्रीडा प्रकार शुल्क ३०० रुपये.एक रात्रीचा मुक्काम १०० रुपये (प्रति व्यक्ती)शालेय सहलींना विशेष सवलत

https://www.dailymotion.com/video/x844n0s