ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 12 - शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत पण पारदर्शी कारभार करताना जी दिशा ठरवली आहे त्या दिशेने जाणार आहे. पारदर्शी अजेंड्यावरच युती होईल. युतीची चर्चा आणि निर्णय पक्षाचे पदाधिकारी घेतील, कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठाणे येथे आयोजित भाजपाच्या कर्यकरणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतं होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या काही गोष्टी शिवसेनेला मान्य नसतील. त्यांच्याही काही गोष्टी आम्हाला खटकतात. शिवसेनेच्या सगळ्या गोष्टी भाजपला मान्य असतील असेही नाही. यावेळी त्यांनी नगरपालिकां निवडणुकीत भाजपावर दाखवलेल्या विश्वासबद्दल जनतेचे आभार मानले. तसेच नगरपालिकेत आपल्याला मिळालेलं यश ही सुरवात आहे. मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका, आपल्याला जनतेची काम करायची आहेत असे आव्हान कार्यकर्यांना केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे - आगामी निवडणुकीत आत्मविश्वासानं सामोरं जायचं आहे-देशातील 50 टक्के एफडीय महाराष्ट्रात- राज्यातील महत्त्वाची शहरं 'वाय-फाय'मय करत आहोत, मुंबई हे देशातील पहिलं वायपाय शहर करुन दाखवलं.- आम्हाला राजकारण करायचं नसून संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. - आव्हानांचे संधीत रुपांतर केले, जलयुक्त शिवारामुळे दोन वर्षात ४ हजार गावे दुष्काळमुक्त- केंद्र सरकारकडून २५ हजार कोटी रुपये सिंचनासाठी मिळाले- काँग्रेसन शिक्षणाचं खासगीकरण आणि व्यापारीकरण केलं आहे.- विदर्भ-मराठवाड्याती पाच हजार गावांचे रुपडं बदलणार.- पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर काळ्या पैशाच्या विरोधात नियोजनबध्द पध्दतीने पावलं उचलायला सुरूवात केली- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांने नामांकित शाळेत शिकावं म्हणून प्रयत्न केले- गेल्या 15 वर्षात एकाही सरकारनं काम केलं नाही - समाजाच्या सगळ्या घटकापर्यंत विकास पोहचवायचा आहे, कोणताही समाज एकमेकासमोर उभा करायचा नाही- जनतेचा विश्वास कायम ठेवू- राज्य करताना शिवराय आदर्श - महाराष्ट्रला बदलण्यासाठी हाती घेतलेलं मिशन पुर्ण करणार- महाराष्ट्रात नव्या राजकारणाला सुरुवात- जनतेने प्रत्येक निवडणुकीत भाजपावर विश्वास दाखवावा- राज्य सरकारने ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली.- मराठा मोर्चाला सकारात्मक प्रतिसाद दिला.- मराठा समाजाला शिक्षणाची अडचण निर्माण होऊ नये म्हणून योजना आणली.- धनगर समाजालाही आरक्षण देणार .- गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विश्वाचं वातावरण निर्माण करण्यात यश.- मोदींवर राज्यातील जनतेने विश्वास दाखवला.- नोटाबंदीच्या लढाईला सामान्य जनतेचा पाठिंबा.- 2 वर्षात 4 हजार गावं दुष्काळमुक्त केली.
https://www.dailymotion.com/video/x844o79