ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. ११ - कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. घराघरात साज-या होणा-या गणेशोत्सवा दरम्यान गावात-वाडयांमध्ये रात्रभर भजनाचा कार्यक्रम रंगतो. पहाटेपर्यंत ही भजन चालतात आणि मुंबईहून आलेले चाकरमानीही त्यात रंगून जातात. तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजनाची मोठी परंपरा पहायला मिळते.
गणेशोत्सव ११ दिवस मोठ्या भक्ती भावाने साजरा होतो. जगाच्या पाठीवर कुठेही असलेला कोकणवासीय भजनातील टाळ-मृदुंगाचा नाद कानावर पडताच तृप्त होऊन जातो. कोकणातील हा गणेशोत्सव आगळा वेगळा आणि सामाजिक सलोखा वाढविणारा ठरत आहे.