ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 13 - पंचवटी येथील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्त 13 नोव्हेंबर ११ रात्री ते 15 नोव्हेंबर दुपारी 1 पर्यंत कार्तिक स्वामींची पूजा व अभिषेक होणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता गंगा गोदावरी येथील संगमाचे पाणी विधीवत आणुन पुजेला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी अभिषेक झाल्यानंतर 7 वाजेपासुन मंदिर सर्व भाविकांसाठी खुले ठेवणार आहे. 14 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्तिक पोर्णिमा आहे, नंतर 15 नोव्हेंबर ला 1 वाजेपर्यंत कृतिका नक्षत्र आहे या दोन्ही कालावधीत कधीही भाविक दर्शन घेऊ शकतात.
https://www.dailymotion.com/video/x844ht3