ऑलाइन लोकमत
बीड, दि. १५ - अनुसूचित जाती- जमाती व भटक्या विमुक्तांच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध आज दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित ऐक्य मूक मोर्चा धडकणार आहे. यासाठी जिल्हाभरातून लोक मोर्चासाठी येऊ लागले आहेत. शहरातील रस्त्यावर हातात निळे झेंडे आणि फलक घेऊन क्रिडा संकूलाकडे जाणाºया रस्त्यावर गर्दी झाली आहे. येणाºयांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे.
कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल येथून मोर्चास सुरुवात होणार आहे. महिला, मुलींकडे नेतृत्वाची धुरा असून पक्ष व संघटनांचे जोडे बाजूला ठेवून विविध पदाधिकारी एकत्रित आले आहेत. महिनाभरपासून मोर्चाची तयारी सुरु होती. पाच लाखावर समाजबांधव मोर्चात सहभागी होतील, असा आयोजकांचा दावा आहे. अन्याय, अत्याचाराविरुद्धचल लढाई यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पप्पू कागदे, बाबुराव पोटभरे, अजिंक्य चांदणे, डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी केले आहे.