जयंत धुळप/ऑनलाइन लोकमत
अलिबाग, दि. 15 - गेल्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, मारळ आणि हरिहरेश्वर सागर किनारी कासवांच्या अंडयाचे संरक्षण करुन त्यातून जन्मलेल्या कासवांच्या 500 पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश आले असल्याची माहिती श्रीवर्धन-दिवेआगर सागरी किना-यावरील कासव संरक्षण प्रकल्पाचे प्रमुख श्रीवर्धनचे वनश्रेत्रपाल नरेंद्र पाटील यांनी दिली तर शनिवारी 11 नवजात पिल्ले दिवेआगरच्या समुद्रात सुखरुप झेपावली असल्याची माहिती कासव संरक्षण व संवर्धन मोहिमेतील वनखात्याचे दिवेआगर येथील राऊंड ऑफीसर हरिश्चंद्र नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
जगभर सागरी कासवांची प्रजाती धोक्यात आली असून त्यांची संख्या दरवर्षी कमी होत चालली आहे. मोठया प्रमाणावर होणारे सागरी प्रदुषण, मासांसाठी कासवांची हत्या, कासवांच्या अंडयाची चोरी या सारख्या विविध गोष्टींमुळे कासवांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम होत आहे. मात्र आता कासवांचे संरक्षण करुन ही नामशेष होऊ पहात असलेली सागरी कासवांची प्रजातींचे संवर्धन करण्याकरीता मोठी जागृकता कोकण किनारपट्टीत निर्माण झाली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वनखात्याने या करिता कासव संवर्धन विषयक विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
कासवाची पिल्ले वाळुतुन बाहेर पडून,आपोआप समुद्राकडे जातात
दिवेआगर समुद्र किना-यावर कासवांची घरटी संरक्षित केली आहेत. सागरी कासवे रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. किना : यावरील वाळुत मागच्या पायांनी खडडा करून त्यात 100 ते 150 अंडी घालतात,खडडा बुजवून समुद्राकडे परत जातात. ही अंडी नैसर्गिक उष्णतेने उबुन 45 ते 55 दिवसात पिल्ले बाहेर पडतात.अंडयातून बाहेर पडल्यानंतर 4- 5 दिवसांनी पिल्ले वाळुतुन बाहेर पडून ती आपोआप समुद्राकडे जायला लागतात. अंडी घालुन कासवे परत गेल्यावर कधीही आपल्या घरटयाकडे परत येत नाहीत.
राज्याच्या सागर किना-यांवर 1000 घरटी संरक्षीत तर 40 हजार पिल्ले समुद्रात सोडण्यात यश
वाळूवरील कासवांच्या पावलांच्या ठशांचा मागोवा काढून काही लोक त्यांच्या घरटयांचा शेध घेऊ न अंडयाची चोरी करत. मात्र वनविभाग व सहयाद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या कार्यकत्र्यानी केलेल्या जनजागृती मुळे या प्रकाराला आता आळा बसला आहे. सागरी कासव संवर्धनाचे हे काम 14 वर्षे सातत्याने चालु असुन संपुर्ण महाराष्ट्राच्या किनारपटटीवारील या कामातुन 1 हजाराहुन अधिक घरटी संरक्षित करण्यात येऊ न 40 हजारपेक्षा जास्त पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत.
एक हजार पिल्लांमधुन केवळ एक पिल्लू वाचून मोठे होते
समुद्रात गेलेली पिल्ले मोठी हावुन त्याच किना : यावर घरटे करण्यासाठी परत येतात. जवळपास एक हजार पिल्लांमधुन केवळ एक पिल्लु वाचुन मोठे होते. शिवाय समुद्रामार्गे येणारे प्लास्टिक आणि इतर कचरा कासवांना घरटे करण्यास अडथळा निमार्ण करतो. अशा कच : यामुळे मादी कासवांना सुरक्षित जागा न मिळाल्याने घरटे न करताच ती परत गेल्याच्या घटनांची नोंद आहे.
https://www.dailymotion.com/video/x844vpd