शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

VIDEO- शेततळ्यांनी नगावला केले आबादानी

By admin | Published: December 29, 2016 8:28 PM

ऑनलाइन लोकमत अमळनेर, दि. 29 - राज्यात सर्वाधिक ५० शेततळे बनविण्याचा विक्रम करणाऱ्या नगावची जलपातळी पहिल्याच पावसात दोन ...

ऑनलाइन लोकमतअमळनेर, दि. 29 - राज्यात सर्वाधिक ५० शेततळे बनविण्याचा विक्रम करणाऱ्या नगावची जलपातळी पहिल्याच पावसात दोन मीटरने वाढली आहे. १५ ते २० टक्के प्रमाणात घेण्यात येणारी रब्बी पिके आता १०० टक्के घेता येऊ लागली आहेत. या शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे.जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली नाही म्हणून गाव टॅँकरमुक्त करण्याचा निर्धार घेत सरपंच बापू कोळी यांनी स्वखर्चाने मोठे शेततळे उभारले. प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील यांच्या मदतीने शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेतकऱ्यांना महत्त्व पटवून ५० शेततळे करण्याचा संकल्प केला. रात्रंदिवस कामात सातत्य ठेवून तब्बल ५० शेततळे पूर्ण केले. गावशिवारातून वाहून जाणारे शेतातील पाण्याचे प्रवाह व नाल्याचे प्रवाह यांना एकत्र सलग आठ शेततळ्यांनी जोडले. गावच्या पाणी पुरवठा विहिरीजवळदेखील दोन शेततळे केले. शेततळ्यांमुळे ११३.१० टी.एम.सी जलसाठा झाला. आणि विहिरींची जलपातळी दोन मीटरने वाढली. मेगारिचार्ज त्याचप्रमाणे बापू कोळी, सोबत दिनेश गुलाबराव पाटील, यांनी तीन वर्षांपूर्वी कोरड्या विहिरीत डबर, मुरूम टाकून पाणी सोडून भुजल पातळी वाढवली होती. त्याच धर्तीवर त्यांनी त्यांच्या शेततळ्याजवळ शिवरस्त्यावर स्वखर्चाने ६० फूट लांब,३० फूट रूंद आणि २७ फूट खोल खड्डा खोदला. त्यात दोन फूट डबर टाकून खालून पाईपलाईन टाकून नदीचे वाहून जाणारे पाणी मेगा रिचार्ज खड्यात सोडले. तसेच डबर, मुरूम, रेती टाकून २५ केसींग पाईप टाकून शेतशिवारातील वाहून जाणारे पाणी खड्ड्यात उतरविले. परिणामी जलपातळी वाढली. >विभागीय आयुक्तांकडून कौतुकया शेततळ्यांची पहाणी करण्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी आज नगावला भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. तसेच नगाव पॅटर्न नाशिक विभागासाठी मार्गदर्शक ठरेल असे सांगितले.

https://www.dailymotion.com/video/x844mur