मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' मंडळात एकानंतर एक वाद होताना दिसत आहेत. आज सकाळी पोलिसांच्या कडक निर्बंधांमुळे आधी श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाला. त्यानंतर पोलिसांनी पत्रकारांना आरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक संजय निकम यांचा पत्रकारांना अरेरावी आणि धक्काबुक्की करत असल्याचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय.
कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सामान्यांना आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याची परवानगी नाही. पोलिसांनी गर्दी टाळण्यासाठी परिसरात बॅरीकेडींग केली आहे. दरम्यान, लालबाग गणेश मंडळातील लोकांना आणि पत्रकारांना पास देण्यात आले आहे. पण, पास दाखवूनही पोलिसांनी पत्रकारांसोबत अरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली.
'हात काय, पाय पण लावेन...'पोलीस निरीक्षक संजय निकम स्वतः तर मास्क घातला नव्हता. आणि एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने पास दाखवूनही त्याला आत सोडण्यात आले नाही. उलट त्याला धक्काबुक्की केली. तसेच, पत्रकारांनी हात लावू नका असे म्हटल्यावर, ''हात काय, पाय पण लावेन'', अशी गुंडगिरीची भाषा वापरली. त्या वृत्त वाहिनीच्या पत्रकाराशिवाय इतर पत्रकारांनाही बॅरिकेडच्या बाहेर काढण्यात आले. यावेळीही निकम यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.
'ज्यांना काँग्रेसनं जमिनी राखायला दिल्या, त्यांनीच त्यावर डाका मारला'
'व्हिडिओ पाहून कारवाई करू'दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्या या कृत्यानंतर मीडियाने त्या ठिकाणी आलेल्या पोलिस उपायुक्तांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी व्हिडिओ पाहिला नाही, तो पाहून कारवाई करू असे सांगितले. यानंतर संजय निकम यांनाही बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी एकही शब्द न बोलता काढता पाय घेतला. पोलिसांच्या या वर्तनामुळे आता राज्याच्या गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.