ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13 - दुष्काळासारख्या अस्मानी संकटातही काळ््या मातीत काबाडकष्ट करून उपजिविका केली. पुरंदर उपसा योजनेमुळे जमिनी बागायती होऊन सोन्याचे दिवस आले असताना शासनाने विमानतळाचे भूत आमच्या मानगुडीवर बसविले आहे. शेतीतून येणा-या उत्पादनावर पूर्ण पणे समाधानी आहे, त्यामुळे विमानतळासाठी पुरंदर ताुलक्यात एक इंचही जागा न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील सात गावांतील हजारो शेतकऱ्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईमध्ये पुरंदर तालुक्यात पुण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा केली. पंरतु विमानतळामुळे बांधित होणा-या पारगाव, राजेवाडी, आंबळे, एखतपूर, मुजवडी, खानवडी, वाघापूर या सात गावातील शेतक-यांनी जोरदार विरोध केला आहे.मोर्चात सहभागी झोलेल्या काही शेतक-यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांना निवेदन देण्यात आले. विमानतळासाठी सात गावातील तब्बल २४०० हेक्टर जमिन व १६६० पेक्षा अधिक कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर येणार आहेत. खानवडी हे महात्मा ज्योतीराव फुले यांचे मूळ गाव असून त्याचे स्मारकही येथे आहे. विमानतळामुळे ते इतिहास जमा होईल. त्यामुळे आम्हाला कोणत्याही स्वरुपाचे पॅकेज नको की अन्य कोणतेही आश्वासन. शेतक-यांच्या तिव्र विरोध लक्षात घेऊन शासनाने यापुढे पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी कोणत्याही स्वरुपाचे सर्व्हेक्षण करू नये किंवा आमच्या जमिनीवर आरक्षणाचे शिक्के टाकू नये. शेतक-यांचा विरोध डावलून विमानतळ केल्यास हजारो वेळप्रसंगी आपले प्राण देखील देतील असा इशारा शेतक-यांनी आहे. चिमुरड्याची भावनिक सादपुरंदर तालुक्यात विमानतळ झाले म्हणजे तालुक्याचा विकास होईल, भावी पिढ्यांचे कल्याण होईल, शेतक-यांना चांगले पॅकेज दिले जाईल, भूमिहीन शेतक-यांच्या मुलांना नोक-या देऊन अशी आश्वासनाची गाजर दाखवले तरी एक इंचही जागा विमानतळासाठी देणार नाही. शासनाने विरोध करून देखील विमानतळासाठी जागा घेतल्यास शेतकरी विष पिऊन आत्महत्या करतील असा इशारा मोर्चात सहभागी झालेल्या एका चिमुरड्याने दिला.शेतक-यांना मनसेचा पाठिंबापुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला येथील शेतक-यांनी तिव्र विरोध केला असून, शेतक-यांच्या मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पांठिंबा देण्यात येत असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी येथे जाहीर केले. सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते माजी आमदार अशोक टेकवडे, ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे यांनी देखील विरोध दर्शवला. परंतु हा आमचा वैयक्तिक विरोध असून, पक्षाची भूमिका वेगळी असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.विमानतळाच्या नावाला ही विरोधमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांने पुरंदर तालुक्यात होणा-या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ह्यछत्रपती संभाजीराजेह्ण असे असेल असे जाहीर केले आहे. फुले,शाहू, आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणा-या शासनाला ऐवढाच पुळका होतात तर विमानतळ ज्या महात्मा ज्योतीराव फुले यांच्या मूळ गावात खानवडीत होत त्यांचे नावाची घोषणा करायची होती. परंतु प्रत्येक गोष्टींत शासनाकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप जाधवराव यांनी येथे केला. यामुळे आता विमानतळाच्या नावावरून देखील वाद सुरु झाला आहे.
VIDEO - विमानतळासाठी पुरंदरमध्ये एक इंचही जागा देणार नाही
By admin | Published: October 13, 2016 9:00 PM