शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

VIDEO : पुण्यातील राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला

By admin | Published: January 03, 2017 8:43 AM

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 3 - नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानामधील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला असून ...

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानामधील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला असून हा पुतळा मुठा नदी पात्रामध्ये टाकण्यात आला. ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून डेक्कन पोलिसांनी चार तरुणांविरुद्ध चोरी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या कृत्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने स्वीकारली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
 
संभाजी उद्यानामध्ये गडकरींचा पुतळा 23 जानेवारी 1962 रोजी 43व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बसवण्यात आलेला होता. या पुतळ्याचे अनावरण आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळचे स्थानिक नगरसेवक सदाशिव बाळकृष्ण कुलकर्णी आणि आणि महापौर शिवाजी अमृतराव ढेरे यांच्या पुढाकाराने हा पुतळा संभाजी उद्यानामध्ये उभारण्यात आला होता. 
 
ब्रॉन्झचा हा अर्धाकृती पुतळा ए. व्ही. केळकर यांनी घडवलेला होता. यावर्षी पुतळ्याला 55 वर्षे पूर्ण होत होती. पुतळ्याच्या चौथ-यावर गडकरींच्या एकच प्याला, भाव बंधन, पुण्यप्रभाव, प्रेम संन्यास आणि राज संन्यास या नाटकांची नावे कोरलेला ताम्रपट आहे. तसेच कोनशिलाही आहे. कारंज्याच्या मध्यभागी हा चौथरा असून या भागात सध्या उद्यान विभागाकडून दुरुस्ती आणि सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा 1 वाजून 50 मिनिटांनी चार तरुण उद्यानामध्ये घुसले. ते नेमके कोणत्या बाजूने आले याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु, त्यांनी पुतळा हलवून बाजूला केला. हा पुतळा उचलून उद्यानाच्या पाठीमागूनच वाहात असलेल्या मुठा नदीच्या पात्रामध्ये नेऊन टाकला. त्यानंतर पसार झालेल्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजी महारांची बदनामी करणा-या गडकरींचा पुतळा फोडला असून हा पुतळा गटारगंगेत टाकून दिल्याचा मेसेज सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केला. 
 
या मेसेजमध्ये हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे, गणेश कारले या तरुणांची नावे होती. तसेच स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याचेही मेसेजमध्ये नमूद करण्यात आलेले होते.  यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या कृत्याचे समर्थन करीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुतळा हलवल्याचे सांगितले. 
 
महापालिकेकडे गडकरींचा पुतळा हलवण्याबाबत गेल्या आठ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आम्ही पुतळा हलवल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी यांनी राज संन्यास या नाटकामध्ये संभाजी महाराजांना बदफैली, व्यसनी असे संबोधल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
दरम्यान, पुतळा हलवल्याचा दावा केलेल्या तरुणांनी मात्र, आपण कोणत्याही ब्रिगेडचे कार्यकर्ते नसून संभाजी ब्रिगेडशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. स्वप्निल काळे आणि गणेश कार्ले यांनी नितेश राणेंच्या भाषणापासून प्रेरीत होऊन हे कृत्य केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यावर संभाजी ब्रिगेडने सावध भूमिका घेत ही वैचारीक लढाई असून श्रेयवादाची लढाई नाही. विचारांवर काम करीत असून सर्वच कार्यकर्त्यांचा अभिमान असल्याचे ब्रिगेडने स्पष्ट केले आहे. 
 
पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या प्रमुखांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, नाट्य परिषदेच्या सर्व सभासदांनी दुपारी दिडच्या सुमारास संभाजी उद्याना एकत्र जमून या घटनेचा निषेध केला. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून चौघांचा शोध घेण्यात येत आहे. 
 
 
राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याबाबत प्रतिक्रिया
राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्याची घटना निंदनीय आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत - पालकमंत्री गिरीष बापट
 
पुणेकरांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यांच्याकडून केला जातोय, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. तसेच राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करू - प्रशांत जगताप, महापौर, पुणे
  
संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नाही. ज्या मर्द मराठ्यांनी केलं त्यांना सलाम  – नितेश राणे, आमदार काँग्रेस 
 
 
 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844n1l