शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

अन्य महिला डॉक्टरांचेही व्हिडीओ रेकॉर्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 3:51 AM

चमन धरमवीर चव्हाण (२१) याने अन्य डॉक्टर महिलांचेही व्हिडिओ रेकॉर्डींग केल्याचे तपासात समोर आले आहे.

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून केईएम रुग्णालयात स्विपर म्हणून कार्यरत असलेल्या चमन धरमवीर चव्हाण (२१) याने अन्य डॉक्टर महिलांचेही व्हिडिओ रेकॉर्डींग केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे अन्य गुन्ह्यांतही त्याला अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चव्हाण हा पनवेल येथे कुटुंबियांसोबत राहतो. शस्त्रक्रिया विभागातील महिला डॉक्टरांच्या चेंजिंग रुममध्ये मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डींग केल्याप्रकरणी त्याला भोईवाडा पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक केली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. तेथील महिला डॉक्टर शर्ट शोधत असताना त्यांच्या हाती मोबाईल लागला. आणि चव्हाणचे बिंग फुटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा हा प्रताप सुरु असल्याचा संशय आहे. याबाबतचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती आहे. त्याने अन्य डॉक्टर महिलांचेही व्हिडीओ काढले असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचा मोबाईलमधील डाटा परत मिळविण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी सुरुलकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>महिला स्वीपर नेमणाररुग्णालय परिसरात अधिककाळ असणाऱ्या महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटावे यासाठी रुग्णालयांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. महिला डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांच्या चेजिंग रुममध्ये, त्यांच्यासाठी असणाऱ्या विश्रांती खोल्यांमध्ये पुरुष स्वीपर अथवा अन्य पुरुष कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार नाही. यापुढे या ठिकाणी महिला स्वीपर, महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्यात येणार आहे. चेजिंग रुममध्ये आवश्यक त्या वस्तूच यापुढे ठेवण्यात येतील. अडगळीच्या वस्तू काढल्या जातील.>महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार चेजिंग रुममध्ये आढळलेल्या मोबाईलच्या धक्कादायक प्रकारानंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. महिला कर्मचारी आणि डॉक्टरांसाठी रुग्णालय परिसर सुरक्षित करण्यासाठी महिला चेजिंग रुम अथवा अन्य ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची (स्वीपर, सर्व्हंट) नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. केईएम प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महापालिकेच्या तिन्ही प्रमुख रुग्णालयात प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या जाणार असल्याची माहिती महापालिका प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. शुक्रवार, १९ आॅगस्ट रोजी केईएम रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरच्या कपडे बदलण्याच्या खोलीत एका स्वीपरने मोबाईल कॅमेरा व्हिडिओ मोडवर ठेवला होता.हा मोबाईल ठेवला असल्याचे एका महिला डॉक्टरच्या लक्षात आले.यानंतर त्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. पण, असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून महापालिका अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी केईएम रुग्णालयाची पाहणी केली. यानंतर महिलांसाठी सुरक्षित कार्यक्षेत्र निर्माण करण्यासाठी काही बदल सुचवले आहेत.