ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - लालबाग फ्लायओव्हरवरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. फ्लायओव्हरला तडा गेल्यानं येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. फ्लायओव्हरवरील जॉईन्ट पॉईंटचा रबर सील पडल्यामुळे फ्लायओव्हरला तडा गेला होता. त्यामुळे कोणताही अपघात होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सध्या घटनास्थळी पोलीस आणि MMRDA चे अधिकारी उपस्थित आहेत.
नोव्हेंबर 2016 पासून ते आतापर्यंत तडा गेल्याची घटना तिस-यांदा घडली आहे. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. त्यानंतर तातडीने याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली. फ्लायओव्हरवर वारंवार तडा जाण्याच्या घटना समोर येत असल्यानं हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनत असल्याचे दिसत आहे. शिवाय पुलाच्या बांधकामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक पुलाखालून वळवण्यात आली आहे.
https://www.dailymotion.com/video/x844q5v