ऑनलाइन लोकमत
गुहागर, दि. 13 - अतिउत्साही पर्यटक स्वतःच्या बेजबाबदारपणामुळेच कित्येकदा जिवाला मुकतात. याच गोष्टीचा प्रत्यय आला गुहागर तालुक्यात. कराड येथून पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटक तरुणाचा जीव निरंकार गोयथळे या रिक्षाचालकाने वाचवला.
गुहागर तालुक्यातील हेदवी येथील बामण घळ येथील समुद्रा किना-यावरील ही घटना आहे. यावेळी गोयथळे यांचे आभार मानायचे सोडून सर्व पर्यटक आपापसात अर्वाच्य भाषा वापरत एकमेकांसोबत वाद घालू लागले.
हेदवीच्या बामण घळीवर समुद्रातून कारंज्याप्रामाणे उडणारे पाणी पाहण्यासाठी कराड परिसरातील चार मित्र बाईकवरून हेदवीला आले होते. मज्जा-मस्ती करत असताना त्यातील एक जण बामण घळीत पडला त्याचवेळी तेथील काही पर्यटक त्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले.
हा तरुण बुडत असल्याचं लक्षात आल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले रिक्षाचालक गोयथळे यांनी एका महिलेकडे ओढणीची मागणी केली व घळीत टाकली. विशेष म्हणजे केवळ ओढणीच्या गोयथळे यांनी बुडणा-या तरुणाचा जीव वाचवला.
या सर्व प्रकार घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य पर्यटकांनी मोबाइल कॅमे-यामध्ये कैद केला. अतिउत्साही पर्यटकांमुळे अशा पद्धतीच्या घटना किनारपट्टी भागात होताना पाहायला मिळतात.
https://www.dailymotion.com/video/x844vmv