ऑनलाईन लोकमत
सातारा, दि. ६ - तारळी धरणाच्या पायथ्याचे आपत्कालीन व्हॉल्व्हच्या पत्राचे बॉनेट शुक्रवारी दुपारी अचानक तुटले. यामुळे तारळी नदीपात्रात धरणातून सुमारे पाचशे ते हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. अचानक पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
व्हाल्व्ह निकामी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी धरणाच्या भिंतीजवळ गर्दी केली. ही घटना लक्षात आल्याबरोबर तारळी धरणाचे सहायक अभियंता हेमंत घोलप व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुसरे आपत्कालीन दरवाजा बसविण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, तो अनेक वर्षांपासून वापरात नसल्याने बंद करताना अडथळे आहेत तसेच विद्युत भार पुरेसा येत नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची मदत मागविली आहे.
दरम्यान, पालची यात्रा काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे पालमध्ये नदीपात्रातच व्यापाºयांनी तंबू टाकले आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो, त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. मात्र, घाबरण्याचे कारण नाही, असे धरण व्यवस्थापनातर्फे सांगण्यात येत आहे.
आपत्कालीन गेट बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, विद्युत पुरवठा होण्यात अडथळे आहेत. दरम्यान, नदीकाठच्या लोकांनी घाबरू नये, असे आवाहन सहायक अभियंता हेमंत घोलप यांनी केले आहे.
https://www.dailymotion.com/video/x844nfn