शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
2
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
3
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
4
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
5
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
6
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू
7
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
8
Arjun Tendulkar Video: Video: अर्जुन तेंडुलकरचा धमाका! ९ विकेट्स घेत फिरवला 'गेम'; संघाला मिळवून दिला विजय
9
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
10
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
11
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
12
बँकांप्रमाणे LIC मध्येही होणार डिजिटल क्रांती; मोठ्या बदलासाठी Infosys कडे दिली जबाबदारी
13
PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत
14
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
15
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का
16
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
17
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान
18
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
19
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात

VIDEO - मुंबई मनपाच्या कार्यक्रमात शिवसेना-भाजपा पुन्हा आमनेसामने

By admin | Published: July 05, 2017 1:17 PM

जीएसटीनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई महापालिकेचा पहिला धनादेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करणार आहे.मात्र या कार्यक्रमापूर्वीच शिवसेना-भाजपा आमनेसामने ठाकलेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमात शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशात लागू झालेल्या जीएसटीनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई महापालिकेचा पहिला धनादेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केला आहे. वस्तू व सेवा कर प्रणालीचा धनादेश सुपूर्द समारंभ पार पडला आहे. मात्र यापूर्वी शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी दिली. 
 
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी भाजपाच्या नगरसेवकांनी ""मोदी- मोदी"" अशी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली होती, तर या प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी ""चोर है-चोर है"", अशी नारेबाजी दिली. एकूणच राज्यातील सत्तेत एकत्र नांदत असणारे शिवसेना-भाजपा या दोस्तांमध्ये कोणत्या-न्-कोणत्या कारणावरुन नेहमीच कुस्ती सुरू असते. 
 
आणखी बातम्या वाचा
 
देशभरात लागू जीएसटी कर प्रणाली 
 
 1 जुलैपासून देशभरात जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर अखेर लागू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली. जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ग्वाहीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्ष दुजोरा देत चौदा वर्षांची एक यात्रा सफळ संपूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. त्या बरोबरीनेच मध्यरात्रीच्या ठोक्याला संसदेच्या सेंट्रल हॉलमधील ऐतिहासिक सोहळ्याद्वारे जीएसटी अर्थात गुड्स अ‍ॅड सर्व्हिस टॅक्स ही नवी कररचना देशभरात लागू झाली.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, जीएसटी केवळ आर्थिक सुधारणा नसून सामाजिक सुधारणेचे प्रतीक आहे. यातून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे स्वप्न केंद्र आणि राज्य मिळून साकार करणार आहेत.
 
जीएसटीचा अर्थ काय हे सांगताना त्यांनी गुड अँड सिम्पल टॅक्स असा नवा फुलफॉर्म पेश केला. भ्रष्टाचाराला आळा घालणारी जीएसटी हे कोणत्याही एका पक्षाचे वा, एका नेत्याचे नव्हे, तर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे, असंही मोदी यांनी स्पष्ट केले.