ऑनलाइन लोकमत अकोला/बुलडाणा, दि. २० : उरीवर झालेल्या भ्याड हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेनेने अकोला आणि बुलडाण्यात पाकिस्तान विरुद्ध अंदालन केलं. अकोल्यात मदनलाल धिंग्रा चौकात तर बुलडाण्यात लोणारमध्ये नवाज शरीफ व पाकिस्तानचा झेंडा जाळला आणि उरी हल्ल्याचा निषेध नोंदविला. त्यावेळी उपस्थितांनी पाकिस्तानविरुद्ध घोषणाबाजीही केली.
अकोल्यात जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी तरुण बगेरे, राजेश मिश्रा, मुकेश मुरू मकार व योगेश अग्रवाल आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.