ब्रम्हानंद जाधव
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा , दि. २ - विश्वमित्र सातपुड्याच्या पायथ्याला लागून असलेल्या मेहकर तालुक्यातील शिवचंद्रमोळी येथील शिवमंदिरात संपूर्ण श्रावण महिन्यात भाविकांनी विणा खांद्यावर घेऊन दिवस-रात्र विणा वाजविल्या. काशिखंडाच्या तिसºया अध्यायात दाखले असलेल्या या शिवमंदिरात श्रावण मासात अखंड विण्याचा नाद घुमला.
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मंदिरे व एैतिहासिक स्थळांचा उल्लेख ब्रम्ह्यांड पुराणात दिसून येतो. तसेच राज्यात सप्तऋषींची मंदिरे एकमेव बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात पाहावयास मिळतात. विश्वमित्र सातपुड्याच्या पायथ्याला लागूणच मोळी हे गाव असून, मोळी येथे प्रभु रामचंद्र यांनी शिवपींड स्थापन केल्याचा पुरावा काशिखंडाच्या तिसºया अध्यायात पाहावयास मिळतो. त्यामुळे मोठा एैतीहासीक वारसा या मंदिराला लाभलेला आहे. मोळी येथील शिवमंदिरात वर्षभर भाविक दर्शनासाठी येतात. मात्र पवित्र श्रावण महिन्यात शंकराचे दर्शन घेणे भाविकांसाठी एक आनंदाची पर्वणी असते. श्रावण महिन्यात मोळी येथील शिव मंदिरात दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा संपुर्ण श्रावण महिन्यात शिवपुराण व विविध धार्मिक कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. भजन, कीर्तन, हरिपाठ यामध्ये वापरण्यात येणाºया टाळ, मृदुंग, झांज यापेक्षा सर्वात महत्वाचे समजल्या जाणारे वाद्य म्हणजे विणा. हरिनाम सप्ताहामध्ये तसेच मंदिरामध्ये विणा वाजविण्याची पंरपरा अनेक संतापासून भारतीय संस्कृतीला लाभली आहे. परंतू, बदलत्या काळानुरून अनेक पारंपारीक वाद्य वाजविण्याची पंरपरा लोप पावत आहे; मात्र, विणा वाजविण्याची ही परंपरा जोपासण्याचे काम मोळी येथील भाविकांनी केले आहे. संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये अखंड विणा मोळी येथील भाविकांनी शिवमंदिरात वाजविला. दिवस-रात्र हा शिवमंदिरातील विणा खांद्यावर घेवून वाजविण्यात आला. दर्शनासाठी येणाºया हजारो भाविकांच्या कानाला या विण्याचा नाद मंत्रमुग्ध करून टाकत होता.
लोकसहभागातून घडविले एकतेचे दर्शन
शिवमंदिराला तीर्थक्षेत्र दर्जाची प्रतीक्षा असून, शासनाकडून अद्यापपर्यंत कुठलाच निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे आजपर्यंत दुर्लक्षीत असलेल्या मोळी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन शासकीय निधीची प्रतीक्षा न करता शिवमंदिर व गावच विकास करण्यासाठी लोकसहभाग वाढविला आहे. याच लोकसहभागातून मंदिरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम भाविक राबवित आहेत. श्रावण महिन्यात मोळी येथील ग्रामस्थांच्या लोकसहभागाने एकतेचे दर्शन घडवून दिले.
विणा वाजविण्यासाठी युवकांचाही पुढाकार
मोळी येथील शिवमंदिरामध्ये विणा हे वाद्य वाजविण्यासाठी केवळ वृद्ध भाविकच समोर आले नाही; तर गावातील अनेक युवकांनीही विणा वाजविण्यासाठी पुढाकार घेतला होता. महिनाभर विणा वाद्य सुरू ठेवण्यासाठी गावातील सर्व लोक एकत्र आले. त्यानंतर भाविकांनी ३१ गट करून एका गटात चार लोकांची निवड करण्यात आली. प्रत्येक दिवशी एका गटाकडून विणा वाजविण्यात आला.