ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ - कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे ( सीओईपी) च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'स्वयम' या उपग्रहाचे बुधवारी पीएसएलव्ही प्रक्षेपकाव्दारे यशस्वी प्रक्षेपण झाले. सकाळी ९.२६ वाजता प्रक्षेपण झाल्यानंतर काही मिनिटांनी हा उपग्रह अवकाश कक्षेत स्थिरावला.
उपग्रह कक्षेत स्थिरावतचा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. विद्यार्थ्यांनी बनविलेला भारतीय बनावटीचा हा पहिलाच लघू उपग्रह आहे. तसेच भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा कमी वजनाचा उपग्रह म्हणूनही ‘स्वयम्’चे वेगळेपण आहे.
साधारणपणे एक वर्ष हा उपग्रह कार्यरत राहील. प्रक्षेपण झाल्यानंतर ४५ मिनिटांनी अॅन्टिना निश्चित जागेवर येईल. त्यानंतर उपग्रह व सीओईपीमध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागेल.