ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ७ - वणी येथील सप्तश्रुंगी गडावर शुक्रवारी पहाटे एसटीला झालेल्या अपघातात ३० जण जखमी झाले. पहाटे पाचच्या सुमारास नांदुरीपासून दोन किमी अंतरावर असताना बसला अपघात झाला.
पहाटेच्या वेळी धुके होते, त्याच वेळेस पुढच्या बससमोर अचानक एक म्हैस अाली असता चालकाने करकचून ब्रेक दाबले. व त्यामुले मागून येणारी बस पुढच्या बसवर जोरात आपटली व हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस नाशिक जिल्ह्यातील कळवण आगारातील होती.
२० जखमींवर वणी येथील ग्रामीण रुग्णालयात तर 10 गंभीर जखमींना गडावरील न्यासाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमींना तातडीने प्रत्येकी ५०० रुपयांची मदत करण्यात आली.
बस अपघातातील जखमींची नावे :
संदीप साळवे वय २८, गणेश सालवे वय २६, सुरज खोतकर वय २४, भाऊसाहेब साळवे ३४, मदन साळवे ३२, अमोल घुमरे २४,
सर्व. सोमठाण ता. सिन्नर राजेंद्र शिंदे १७, गयाबाई बर्डे ४०, भास्कर बर्डे ४५, मनिषा बर्डे १९, सौरभ राेकडे १७, चंद्रकात सांगळे, रा. हिंगेवाडी, ता. सिन्नर अशोक रोकडे ४५, विलास वाघ ३५, दिलीप रोकडे ४०, लक्ष्मण बागले ४७, भगवान रोकडे ३२, शांताराम गजानन वाघ ३५, शांताराम तोडावत ५०, दत्तु निमोणे ४५, बंडु वाघ ३०, कैलास अहिरे २७, अंदानेर, ता. कन्नड, जि. अौरंगाबाद