दीपक होमकर
सोलापूर, दि. १८ - सोलापूरी चादरीचा लौकिक सा-र्य जगात करण्यात येथील ज्या समाजाचा सिंहाचा वाटा आहे त्याच पद्मसाळी समाजाचा आज सर्वात मोठा सण अर्थात मार्कंडेय महामुंनी जन्मोत्सव. दरवर्षी रक्षा बंधनाच्या मुहुर्तावर मार्कंडेय महामुनी जयंती मोठ्या उत्साहात सोलापूरात साजरी होते. पद्मसाळी बांधवांकडून यानिमित्त भव्य रथोत्सव काढण्यात येतो. सोलापूरातील चौकाचौकात त्या रथाचे जंगी स्वागत होते. सकाळी ११ ला निघालेला रथाच्या मिरवणूकीत अनेक भागातून मिरवणुका सहभागी होतात.
ढोल ताशा अशा पारंपारिल वाद्याबरोबर डोल्बी, रेजर लाईट ही यात सायंकाळी सहभागी होतात व मिरवणुकीतला उत्साह द्विगुणित होतो. रात्री दहा वाजेपर्यंत मिरवकीतला जल्लोष टीपेला पोचतो अन न्यायालयाच्या आदेशामुळे दहाला नाईलाजाने रथोत्सवाची सांगता होते.