शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

VIDEO- राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण

By admin | Published: April 17, 2017 4:16 PM

राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 17 - राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये आज दुपारी गायकवाडांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाणीत गायकवाडांच्या छातीला दुखापत झाल्याचंही समजतं आहे. मुंबईतील आंबेडकर भवन पाडकामाच्या रागातून रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. गायकवाड यांना मारहाण करीत असताना पत्नी सोडवण्यासाठी मध्ये गेली असता त्यांनाही मारहाण झाली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी दोन महिला आणि चार पुरुष कार्यकर्त्यांना अटक केली आहे. गायकवाडांना संतापातून मारहाण करण्यात आल्याचं वक्तव्य आनंदराज आंबेडकरांनी केलं आहे. तर प्रकाश आंबेडकरांनी या मारहाणीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. रत्नाकर गायकवाड यांच्यावर अमित भुईगड, श्रीरंग ससाणे, शांताबाई धुळे, दिनेश साळवे, गौतम गवळी, रेखाबाई उजागरे यांनी हल्ला केला असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.  (रत्नाकर गायकवाड यांना अटक करा)तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले आणि त्यांच्या चळवळीचे केंद्र राहिलेले आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस, मुंबई 25 जून 2016 रोजी रात्री 2 वाजता रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी पाडली होती. त्यानंतर रत्नाकर गायकवाडांविरोधात बौद्ध अनुयायांचा संताप उफाळून आला होता. त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करणारे निवेदन सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूरतर्फे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले होते. सरकार एकीकडे कोटी रुपये खर्च करून डॉ. आंबेडकरांच्या संबंधित वास्तू आणि ठिकाणाची स्मारके बनवित असताना त्यांनी ज्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकर भवनमधून बहुजनांसाठी ऐतिहासिक चळवळ चालविली. तीन- तीन वृत्तपत्रे काढली, ती वास्तूच रत्नाकर गायकवाड व त्यांच्या साथीदारानी जमीनदोस्त केली. त्यामुळे देशातील करोडो जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यासाठी सरकारने त्यांना त्वरित अटक करावी. अन्यथा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकतो, असा इशारा सत्यशोधक समाजाने दिला आहे. सरकार एकीकडे करोडो रुपये खर्च करुन डॉ. आंबेडकरांच्या संबंधित वास्तू आणि ठिकाणाची स्मारके बनवित असताना त्यांनी ज्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस व आंबेडकर भवनमधून बहुजनांसाठी ऐतिहासिक चळवळ चालविली. तीन- तीन वृत्तपत्रे काढली, ती वास्तूच रत्नाकर गायकवाड व त्यांच्या साथीदारानी जमीनदोस्त केली. त्यामुळे देशातील करोडो जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यासाठी सरकारने त्यांना त्वरित अटक करावी. अन्यथा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असा इशारा सत्यशोधक समाजाने दिला होता.(रत्नाकर गायकवाड यांना तत्काळ अटक करा)गेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ऐतिहासिक वास्तूमधून बहुजन समाजाची स्वाभिमानी चळवळ चालविली तसेच बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमधून जनता, प्रबुद्ध भारत, मूकनायक, अशी नियतकालिके काढली, तीच वास्तू उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यामुळे एक प्रकारे हा बाबासाहेबांच्या चळवळीवर चढविलेला हल्ला आहे. हे कृत्य करणाऱ्या रत्नाकर गायकवाड़ व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत सिंधुदुर्गातील आंबेडकरप्रेमी जनतेने 8 जुलै रोजी कणकवली शहरातून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.