शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

VIDEO - शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Published: August 23, 2016 4:51 PM

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एस.टी.बसमध्ये कोंबून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दाताळा ता.मलकापूर परिसरात दिसून येत आहे

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. २३  : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एस.टी.बसमध्ये कोंबून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दाताळा ता.मलकापूर परिसरात दिसून येत आहे. मात्र शैक्षणिक भविष्य पाहता विद्यार्थी निमूटपणे हा सर्व त्रास सहन करीत आहेत. मलकापूर तालुक्यातील दाताळा परिसरातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याने या परिसरातील दाभाडी, पिंप्री गवळी, चावर्दा, पोफळी, पिंप्री माकोडी, टेंभी, बेलुरा, शेंबा, टाकरखेड, लासुरा व या परिसरातील इतर अशा १२ ते १५ गावातील शेकडो विद्यार्थी दाताळा येथे दररोज शिक्षणासाठी ये-जा करतात. यासाठी विद्यार्थ्यांनी एस.टी.महामंडळाकडे प्रवासभाड्याची रक्कम अग्रीम भरुन पासेस सुध्दा काढल्या आहेत. मात्र नियोजित प्रवासी असताना सुध्दा एस.टी.महामंडळाकडून या विद्यार्थ्यांची बसेसची व्यवस्था करण्यात आली नाही.

या मार्गावर शाळा भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेवर बसफेऱ्या आहेत. मात्र  बस मलकापूर येथून निघल्यानंतर आधीच्या थांब्यावरच प्रवाश्यांनी खचाखच भरुन येतात. त्यामुळे दाताळा येथे  बसेस आल्यानंतर त्यामध्ये पाय ठेवायला सुध्दा जागा नसते. मात्र अशाही परिस्थितीत घरी जायला उशीरा झाला तर घरचे चिंताग्रस्त होतील यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांना खचाखच भरलेल्या एस.टी.बसमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

प्रवाश्यांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य एस.टी.महामंडळ मिरविते मात्र दुसरीकडे दुसरीकडे विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात न घेता जनावरांपेक्षाही निदर्यतेने जीवघेणी वाहतूक करीत आहे. परिणामी एस.टी.महामंडळाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी न खेळता दाताळा मार्गे मलकापूर तसेच बुलडाणा रस्त्यावर जादा बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी सुध्दा विद्यार्थी पालकवर्गाकडून केल्या जात आहे.