ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 26 - जिल्हयात सर्वत्र हागणदारीमुक्ती व स्वच्छता राखण्यासाठी प्रशासन सरसावले असून त्यांच्या सोबत विद्यार्थीही सहभागी होऊन गावाच्या स्वच्छतेच्या कामात भिडले आहेत.प्रशासनाच्यावतिने उघडयावरील हागणदारीमुळे व गावात साचलेल्या घाणीमुळे काय दुष्परिणाम होतात याबाबत जनजागृती करीत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केल्या जात आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटल्याने विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात हिरारीने भाग घेऊन स्वतःच अनेक शाळेतील विद्यार्थी गावाची स्वच्छता करताना दिसून येत आहेत.वाशिम तालुक्यातील बिटोडा भोयर येथील शालेय विद्यार्थी दररोज गावाची स्वच्छता करून गावकऱ्यांना स्वच्छतेच्या महत्वाबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत.
VIDEO- हागणदारीमुक्तीसह स्वच्छतेसाठी सरसावले विद्यार्थी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2016 3:50 PM