नंदकिशोर नारे/ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 8 - अन्न-पाण्याविना होरपळणारे जीव, छोटे प्राणी व पक्षी बघून मन हेलावून गेलेल्या व स्वताच्या कुटुंबाचीच पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ करावी लागणाऱ्या ६० वर्षिय सुंदराबाई महादेव कातडे यांचे पक्षीप्रेम सर्वत्र कौतूकाचा विषय ठरत आहे. गत सात वर्षांपासून सुरू केलेल्या पक्ष्यांसाठीच्या पाणवठे व अन्नछत्रामुळे अनेक पक्षी आपली तहान व भूक भागवितांना दिसून येत आहेत. मंगरूळपीर तालुक्यात कंझरा नावाचे एक छोटेसे गाव. या गावात सुंदराबाई महादेव कातडे यांचे कुटुंब वास्तव्यास असून, केवळ एक एकर शेतीवर आपल्या चार सदस्स्य असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या करतात. दिवसभर मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून आपला संसार गाडा चालवितात. मात्र अन्न पाण्याविना होरपळणाऱ्या छोटया छोट्या जिवाचे हाल न बघविल्याने सुंदराबाईने आपल्या घराजवळच असलेल्या एका झाडावर सर्व दिशेने जिथे जागा दिसेल तेथे पक्ष्यांसाठी पानवठे व अन्नछत्र उभारले. सुरुवातील एकट-दुक्कट पक्षी यायचे. आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून काही पक्ष्यांनी तेथे स्वत:चे घरटेच निर्माण केलेले दिसून येत आहेत. ज्याप्रमाणे मनुष्याची दिनचर्या असते त्याचप्रमाणे या झाडावर पशुपश्यांची दिनचर्या दिसून येते. सकाळच्यावेळी सर्वत्र पक्ष्यांच्या किलबिलाट दिसून येतो. सुंदराबाई आपल्या दैनंदिन जीवनाची सुरूवात स्वता पशुपक्ष्यांच्यासेवेपासून करताना दिसून येत आहेत. सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी उभारण्यात आलेल्या पाणपोईमध्ये पाणी भरणे, त्यांच्या खायाची व्यवस्था करणे व यानंतर आपल्या कामास सुरूवात करण्याचा दिनक्रम सुंदरबाई यांनी हाती घेतला आहे. मुले भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असून ते सकाळीच आपल्या व्यवसायात मग्न होवून जातात. पोटासाठी वणवण फिरणारे कातडे कुटुंबिय मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पशुपक्ष्यांना वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. वाढते प्रदूषण, मोबाईलच्या ध्वनीलहरी, विषारी किटकनाशक, सिमेंटच्या घरांमुळे चिमण्या व इतर छोटे पक्षी दुरापास्त होण्याच्या मार्गावर आहेत. यातकंझरा येथील सुंदराबाई कातडे यांनी पशु-पक्ष्यांच्या तृष्णा व क्षुधा प्राप्तीसाठी सुरू केलेल पानवठे व अन्नछत्र तयार करून आपल्या आगळया-चेगळया भुतदयेचा परिचय दिला.
https://www.dailymotion.com/video/x844trt