दीपक होमकर
सोलापूर, दि. १६ : जरीकाठाच्या भारदस्त नऊवारी साड्या, हातात लेझीम अन ढोल ताशाच्या निनाद तुफानी जल्लोषात सादर होणारे लेझीमचे डाव अन त्याच वेळी डोक्यावरील फेट्याचा डौलात नाचणारा तुरा अशा सर्वात हटके डामडौल घेउन निघालेली विजापूर रोड मध्यवर्ती मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांची मिरवणूक लक्षवेधी ठरली.
सोलापूर - विजापूर महामार्गावरुन आज शेकडो मिरवणुका दुपारी चार पासून मध्यरात्री पर्यंत झाल्या मात्र विजापूर रोड मध्यवर्ती मंडळाची मिरवणूक अविस्मरणीय ठरली ती महिला पथकाच्या अतिशय जोशपूर्ण लेझीम पथकाने. सुमारे ३० महिला पारपारिक वेशुभुषेत या पथकात सामिल झाल्या होत्या. लेझीमचे विविध डाव जल्लोषी आरोळी देत दृतगतीत सादर करताना पाहणार्यानाही प्रतिसाद द्यायला भाग पाडत होते.
सायंकाळी पाच च्या सुमारास आरटी ओ कार्यालयापासून सुरु झालेली मिरवणूक विविध इंदिरा नगर मार्गे विजापूर रस्ता व तेथून सरळ संभाजी तलावात आली. रात्री अकराच्या सुमारास बाप्पाचे विसर्जन झाले.