ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 1 - जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न व अनेक अडचणींमुळे शेतकरी बैलांऐवजी मिनी ट्रॅक्टरने शेतीची मशागत करीत असल्याने पोळ्याला जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी बैलाऐवजी मिनी ट्रॅक्टर सजवून त्यांच्या मिरवणुका काढल्या.चारा महागल्याने शिवाय आधुनिक शेतीचा वेध लागल्याने बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरने शेतीची मशागती करतात. कापूस, ऊस, केळी या पिकांची मशागत ट्रॅक्टरने होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांशी मैत्री तोडली आहे. परंतु पोळा आला की या शेतकऱ्यांना बैलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मातीपासून बनविलेल्या बैलांचे पूजन करून ट्रॅक्टरला सजवतात आणि या ट्रॅक्टर्सची मिरवणूक काढतात. गुरुवारी पोळ्यानिमित्ताने सायंकाळी बोरद, रांझणी ता.तळोदा, कोळदा, आष्टे ता.नंदुरबार या गावांसह इतर गावांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी सजवलेल्या ट्रॅक्टर्सच्या मिरवणुका काढल्या. कोळदा गावात वाजंत्रीसह ट्रॅक्टरची मिरवणूक निघाली होती तर बोरद गावातही अनेक ट्रॅक्टर्सच्या मिरवणुका निघाल्या. दरम्यान, पोळ्यानिमित्त बहुतांश गावांमध्ये बैलांना सजवून त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या.
VIDEO- बैल नसल्याने आता पोळ्याला ट्रॅक्टरांची मिरवणूक
By admin | Published: September 01, 2016 7:51 PM