अमोल ठाकरे / ऑनलाइन लोकमत
संग्रामपूर(बुलडाणा), दि. 22 - शेतक-यांविषयी अनुद्गार काढणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची कोरड्या नदीत तेरवी करुन शेतक-यांनी सोमवारी अनोख्या पध्दतीने निषेध व्यक्त केला. यावेळी शेतकºयांनी मुंडन व पींडदानही केले.
माणसाची तेरवी ही साधारणत: मरणानंतरच साजरी केली जाते. एखाद्याच्या पाठीमागे तेरवी साजरी करायला कोणी नसेल तरच त्या व्यक्तीकडून जिवंतपणी स्वत:ची तेरवी साजरी करुन घेतली जाते. पण असे उदाहरणही विरळच असते. याशिवाय आणखी एक अपवाद म्हणजे घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्याला कोणी फारच कंटाळले तर त्याला ‘तू आमच्यासाठी मेलास’ असे म्हणून त्याची जिवंतपणी तेरवी साजरी करण्याची धमकी दिली जाते. उद्विग्नतेतून व्यक्त होणारी ही भावना असते. तीच आता शेतक-यांच्या मनात निर्माण झाली आहे आणि ती सुध्दा दुसºया तिसºया कोणाबद्दल नाही तर सत्ताधारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षाबद्दल.
एवढी तूर खरेदी केली तरी रडतात ..... असे म्हणून दानवे यांनी शेतकºयांप्रती अनुद्गार काढले होते. त्यामुळे ज्यांच्याकडून मदतीची आशा करावी तोच मनात राग ठेवून वैºयासारखे वागताना दिसत असल्याने शेतकरीवर्गात नाराजी निर्माण झालेली आहे. याविषयी विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील पांडव नदीपात्रात शेतकºयांनी दानवे यांचा निषेध करण्यासाठी अनोखे आंदोलन केले. यामध्ये दानवे यांच्या तेरवीचा विधी पार पाडण्यात आला. यावेळी कोरड्या असलेल्या नदीपात्रात दानवेेंचे पींडदान व मुंडन करुन शेतकºयांनी सर्व विधी पार पाडले. यामध्ये प्रामुख्याने युवक काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस गणेश टापरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे यांच्यासह शेतकरी गजानन मुंडे, विजय माळोकार, नितीन गोडेकर, गोपाळ कांबळे, अमोल गोल्हर, आकाश हातेकर, गोपाल बावस्कार तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी राजू राठोड, वरवट बकालचे सरपंच संतोष टाकळकर, हरिदास दामधर, दिलीप वानखडे, गुलाब वानखडे, संतोष गोल्हर, गणेश नांदोकार आदींनी सहभागी होवून तेरवीचा कार्यक्रम पार पाडला. यानंतर भोजनही देण्यात आले. तसेच नारेबाजी करुन दानवेंचा निषेध करण्यात आला. सदर आंदोलन हे परिसरात चर्चेचा विषय ठरले असून शेतकरीवर्गात दानवेंबद्दल निर्माण झालेला रोष या माध्यमातून बाहेर पडल्याचे दिसून येते.
शेतक-यांच्या आंदोलनात युवक काँग्रेस पदाधिका-यांचाही सहभाग-
शेतकरी दानवेंचे पींडदान करुन तेरवी साजरी करणार असल्याचे समजताच युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनीही आंदोलनास पाठिंबा दर्शवित उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणेश टापरे यांनी स्वत: मुुंडन करुन शेतक-यांचा उत्साह वाढविला.
शेतकरी हा अन्नदाता असून त्याच्याप्रति अनुदगार काढणे म्हणजे कृतघ्नपणाचे लक्षण होय. शेतकºयांच्या समस्यांचे भांडवल करुन सत्ता मिळविणाºया लोकप्रतिनिधीला हे शोभनीय नाही. शेतक-यांप्रती आस्था असल्याने व स्वत: शेतकरी असल्याने शेतकºयांच्या या आंदोलनात सहभागी झालो. - गणेश टापरे, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस
पाह व्हिडीओ-
https://www.dailymotion.com/video/x844zce