शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

VIDEO- आमगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2016 5:41 PM

तलासरी तालुक्याच्या आमगाव भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर मंगळवार पहाटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

सुरेश काटे/ऑनलाइन लोकमततलासरी दि. 6 - तलासरी तालुक्याच्या आमगाव भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर मंगळवार पहाटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात अडकल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून देखील वरिष्ठ अधिकारी बेफिकीरपणे आरामात घटनास्थळी कोणतेही साहित्य न आणता आले. मात्र आच्छाड वन परिक्षेत्रातील वन कर्मचारी , वन्यजीव एनजीओ डहाणूच्या कार्यकर्त्यांनी बिबट्याला पकडण्यास विशेष मेहनत घेतली.बछड्यासह फिरणाऱ्या मादी बिबट्याने गेल्या दोन महिन्या पासून आमगाव , डोंगारी भागात धुमाकूळ घालून शेतकऱ्याच्या शेळ्या, बकऱ्या, कोंबडी, कुत्रीही मारून खाल्ली. एवढेच काय या भागातील आदिवासी शेतकरी वसंत इरिम व धनसुख धोडी याच्या वर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. वन खात्याला वारंवार बिबट्याचा बंदोबस्त करण्यास सांगूनही दुर्लक्ष करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना 'लोकमत'च्या वृत्ताने जाग आली. अन् या  भागात वन्यजीव संस्था डहाणूच्या मार्गदर्शनाखाली पिंजरे लावले. पिंजऱ्यात गेल्या पाच दिवसांपासून बकरी, कुत्री ठेवूनही हुलकावणी देणारा बिबट्या आज अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद होताच कार्यरत वन कर्मचारी व गावकरी पिजऱ्या जवळ धावले व पिंजऱ्याला कपड्याने गुंडाळले तो पर्यंत आजूबाजूच्या परिसरातील हजारो लोक बिबट्याला पाहण्यासाठी पिंजऱ्याच्या ठिकाणी धावले.पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला हे समजूनही वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी आरामात आले पण पिंजरा रस्तावर आणून गाडीत चढविण्या साठी लागणारे साहित्य न आणता हात हलवीत आले परंतु गावकर्यांनी व एनजिओ च्या कार्यकर्त्यांनी साहित्याची जुळवा जुळवी करून वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने पिंजरा जंगलातुन रस्त्यावर आणून गाडीत चढवला माणसावर हल्ला करणारा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी या मादीचे बछडे व अजून काही बिबट्याचा वावर या भागात असल्याने वन विभागाने या भागात पिंजरे लाऊन ठेवावे अशी मागणी आमगाव भागातील नागरिकांनी केली आहे उशिरा का होईना जागे झालेल्या वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वसंत इरिम यास एक लाख रुपयाचा मदतीचा धनादेश दिला परंतु गंभीर जखमी वसंत इरिम यास मुंबई येथे हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्या उपचारा साठी अधिक आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले.

गावकऱ्यांनी सावधगिरी म्हणून डोंगर , व जंगल परिसरात जाऊ नये असे आवाहन वन विभागा तर्फे गावकऱ्यांना केले आहे.धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला लोकांच्या मागणी वरून पिंजरा लावून पकडण्यात आले आहे.- सोनवणेवनपरिक्षेत्र अधिकारी