आॅनलाइन लोकमतसातारा, दि. 9 - मातीत खेळण्यात बालपण गेले; पण शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने शहरात आले अन् केवळ आठवणी उरल्या. सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनने रविवारी आयोजित केलेल्या मातीतल्या खेळांच्या जत्रामध्ये जुन्या आठवणी जाग्या झाल्या.चिमुरड्यांपेक्षा मोठीच मंडळी जास्त रमली. विटी दांडू, भोवरा खेळण्यात पुरुष मंडळी तर महिला जिबल्या खेळताना दिसत होत्या. यामध्ये दोन हजारांहून अधिक सातारकरांनी सहभाग घेतला.सातारा हिल मॅरेथॉनच्या या वर्षीच्या स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहे. यावर्षी नाव नोंदणीच्या शुभारंभासाठी असोसिएशनतर्फे रविवारी मातीतल्या खेळांची जत्रा भरविण्यात आली होती. जत्रेचे उद्घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष राजू भोसले उपस्थित होते.यामध्ये शिवकालीन युद्धकौशल्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण अतीत येथील छावा ग्रुपच्या सदस्यांनी दिले. प्राचीन लाठी-काठी, तलवार, भालाफेक व दांडपट्टा खेळण्याची संधी मुलांना उपलब्ध करुन दिली. गोट्या, लंगडी, लगोर, भोवरा, विटी-दांडू, टायरगेम, सॅकसेर असे पारंपरिक खेळ खेळताना अनेक जण दिसत होते.
VIDEO- चिमुरड्यांपेक्षा मोठ्यांनाच मातीतल्या खेळांचा लळा
By admin | Published: April 09, 2017 1:34 PM
आॅनलाइन लोकमत सातारा, दि. 9 - मातीत खेळण्यात बालपण गेले; पण शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने शहरात आले अन् केवळ आठवणी ...
https://www.dailymotion.com/video/x844v9k