शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

VIDEO - प्रतिमेच्या विटंबनेमुळे दोन गावात तणाव !

By admin | Published: October 14, 2016 4:31 PM

बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुनर्वसीत सुकळी पैसाळी येथे शुभेच्छा फलकावरील महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर, या गावातील एका गटाने चांगेफळ

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 14 - बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुनर्वसीत सुकळी पैसाळी येथे शुभेच्छा फलकावरील महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर, या गावातील एका गटाने चांगेफळ पैसाळी या शेजारच्या पुनर्वासीत गावातील घरांवर सशस्त्र हल्ला केल्याची घटना शुक्रवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास घडली. चांगेफळ पैसाळी गावातील लोक झोपेत असतानाच हा हल्ला करण्यात करण्यात आला.   हल्लेखोरांनी महिलांना  तसेच जनावरांना मारहाण करीत, घरांची नासधुस केली. त्यांनी वाहनांचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली. जमाव एवढा प्रक्षुब्ध झाला होता, या प्रकरणात पोलिसांनी ४५ आरोपींना अटक केली.  
     चांगेफळ पैसाळी आणि सुकळी पैसाळी ही दोन्ही गावे पुनर्वसीत असून, या दोन गावांच्या मध्ये केवळ एक रोड आहे. दोन्ही गावातील ग्रामस्थ कोणताही सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रम या रोडवर साजरा करतात.  सुकळी पैसाळी येथील एका युवकाने याच रस्त्यावर मांस विक्रीचे दुकान लावले; मात्र नवरात्रोत्सवात मांस विक्रीचे दुकान बंद ठेवावे, अशी मागणी चांगेफळ पैसाळी येथील महिलांनी केली. या कारणावरुन दोन्ही गटात गत १० दिवसांपासून वाद सुरू झाला होता. 
    दोन गटात दररोज वादाची धुसफुस सुरूच असताना, शुक्रवारी पहाटे सुक ळी पैसाळी गावातील १०० ते १५० पुरुष महिलांच्या जमावाने, चांगेफळ ़पैसाळी गावातील एका विशिष्ट गटातील घरांवर सशस्त्र हल्ला चढविला. दुसºया गटातील ग्रामस्थ झोपेत असतानाच हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी महिला, पुरुष, लहान मुले व वृद्धांना मारहाण केली. त्यानंतर घरातील दिसेल त्या वस्तूंची तोडफोड केली तसेच घरासमोरील वाहनांची तोडफोड केली. यावेळी  एका गटातील महिलांनी दुसºया गटातील महिलांना घेरुन मारहाण केली. हल्लेखोरांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही लंपास केल्याचाही आरोप  महिलांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला. यासोबतच बहुतांश घरातील दागिने व रोख रक्कमही हल्लेखोरांनी लंपास केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलिसांनी ७० च्यावर हल्लेखोरांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वृत्त लिहिस्तोवर ४५ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर लुटमारीसह दंगल घडविणे, मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.