शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

VIDEO : मस्जिद बंदरजवळील आग नियंत्रणात, वाहतूक संथगतीने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2017 6:46 PM

 ऑनलाइन लोकमत  मुंबई, दि. 23 -  मस्जिद बंदर स्थानकाजवळील दानाबंदर एलएलसी कम्पाऊंड येथील गोडावून णि झोपडपट्टीला आज संध्याकाळी लागलेली ...

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 23 -  मस्जिद बंदर स्थानकाजवळील दानाबंदर एलएलसी कम्पाऊंड येथील गोडावून णि झोपडपट्टीला आज संध्याकाळी लागलेली भीषण आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तसेच आग लागल्यापासून थांबवण्यात आलेली मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू करण्यात आली आहे.  दरम्यान, या आगीत सहा मुले जखमी झाली असून, त्यांना उपचारांसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.संध्याकाळी ट्रॅकशेजारील झोपडपट्टीला आग लागल्यावर  मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आली  होती. संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळीच लोकलसेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल होत होते. तसेच सीएसटी, दादर आणि इतर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. आगीची तीव्रता पाहून मस्जिद बंदर ते सीएसची दरम्यानचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला  होता. तसेच बेस्टकडून अतिरिक्त बसेसची सेवा सुरू करण्यात आली. आज संध्याकाळी सहाच्या सुमारास मस्जिद बंदर आणि सीएसटी स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकशेजारील झोपडपट्टीला ही आग लागली. त्यानंतर रौद्र रूप घेत ही आग एलएलसी कम्पाऊंडमध्ये पसरत गेली.  मात्र या आगीचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, आगीची खबर मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी 12 फायर इंजिन आणि आठ वॉटर टँकर  घटनास्थळी पाठवण्यात आले. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.