ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - सततच्या पाणीटंचाईसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार ही नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. २०१९ सालापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राची पाणी टंचाईतून मुक्तता करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
अपुर्या आणि अनियमित पावसामुळे राज्यात पाणी टंचाई निर्माण होते आणि कृषी क्षेत्रावर त्यांचा परिणाम होतो. ही परिस्थिती बदलावी हाच जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यामागचा उद्देश आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू आहे. भूजल पातळीत 2 मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या 188 तालुक्यातील 2, 234 गावांमध्ये तसेच शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या 22 जिल्ह्यातील 19 हजार 59 गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबविण्यात येत आहे.
लोकमतने या अभियानाबद्दल सतत पाठपुरावा केला असून गोंदिया, वाशिम, अमरावतीसह काही टंचाईग्रस्त जिल्ह्यात या अभियानामुळे काय फरक पडला याचा आढावा घेतला.
https://www.dailymotion.com/video/x844nyh