ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 10 - शालेय पोषण आहार शिजविणा-या बचत गट संघटनांच्यावतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले, ते दुस-या दिवशीही सुरु होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनाला जिल्हातील पोषण आहार, स्वयंपाकी, मदतनीस कामगार बचत गट संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
त्यांच्या मागण्यांमध्ये शालेय पोषण आहार शिजविणा-यांचा सेंट्रल किचन रद्द करून कार्यरत वैयक्तिक स्वयंपाकी, महिला किंवा पुरुष कामगार व बचत गट सदस्यांना सेवेत कायम करून शासकीय सेवेचे सर्व लाभ देण्यात यावेत, शालेय पोषण आहार अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे दरमाह मानधन २० हजार रुपये करावे. तसेच, त्यांनाही सेवेत कायम करून वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. याचबरोबर सर्व शासकीय सेवेचा लाभ द्यावा यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.
https://www.dailymotion.com/video/x844hha