ऑनलाइन लोकमत/अशोक निमोणकरअहमदनगर, दि़ 26 - जामखेड येथील आठ वर्षे वयाच्या प्रतीक नागरगोजेने एका मिनिटात दोरीवरील 240 उड्या मारण्याचे रेकॉर्ड केले आहेत. या रेकॉर्डची वर्ल्ड इंडिया रेकॉर्डनेही दखल घेतली आहे. प्रतीक हा आठ वर्षे वयाचा असून, तो इयत्ता दुसरीमध्ये लोकमान्य शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत आहे. त्याची उंची कमी असल्याने उंची वाढवण्यासाठी त्याची आई ज्योती नागरगोजे या त्याला रोज सकाळी दोरीवरील उड्या मारायला लावत असत. त्याचा उड्या मारण्याचा वेग हळूहळू वाढू लागला, हे त्याच्या पालकांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला.लिम्का बुक, वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड आणि गिनीज रेकॉर्डमध्ये प्रतीकच्या कामगिरीची दखल होण्यासाठी प्रतीकच्या पालकांकडून प्रयत्न सुरू आहेत. वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड बुकने प्रतीकच्या कामगिरीची दखल घेतली असून, वर्ल्ड इंडियाच्या रेकॉर्डमध्ये प्रतीकचे नाव नोंदविण्यात आले आहे.4 मार्च 2017 रोजी वर्ल्ड इंडिया रेकॉर्डकडून प्रतीक एका मिनिटात 240 दोरीवरील उड्या मारतो की नाही, याची शहानिशा करून या कामगिरीची वर्ल्ड इंडिया रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. हे यश संपादन करण्यासाठी त्याला आई ज्योती, वडील परशुराम, एलआयसीचे विकास अधिकारी विनायक सर्जे, लोकमान्य शाळेच्या मुख्याध्यापिका राळेभात, नागेश विद्यालयचे हजारे, जिल्हा तायक्वाँदो संघटनेचे सचिव संतोष बारगजे यांचे मार्गदर्शन लाभले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये त्याच्या कामगिरीची नोंद होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतीकचे वडील परशुराम नागरगोजे यांनी सांगितले आहे.
VIDEO- आश्चर्य ! त्याने मारल्या एका मिनिटात 240 दोरीवरच्या उड्या
By admin | Published: March 26, 2017 3:27 PM