ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात १७ जण ठार झाले असून, २८ जण जखमी झाले आहेत. पनवेल जवळील शिवकर गावाजवळ लक्झरी बस, इनोव्हा आणि स्वीफ्ट कार यांच्यात हा भीषण अपघात झाला.
सकाळी एक्सप्रेसवेवर मुंबईच्या दिशेने येणारी एक मारुती स्विफ्ट एम एच ०४ सी सी १४८० पंचंर झालेली होती. या गाडीच्या वाहन चालकाने गाडीचा पंक्चर काढण्यासाठी गाडी एक्सप्रेस हायवेच्या डाव्याबाजुला उभी न करता रस्त्याच्या पहिल्या पट्यात उभी केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे.
या वाहनाला मदत करण्यासाठी एका इन्होवा कार रस्त्याच्या डाव्या बाजुला थांबली होती. या गाडीतील प्रवासी स्विफ्ट चालकाला मदत करण्यासाठी खाली उतरले होते. त्यावेळी साताऱ्याहुन मुंबईकडे येणाऱ्या निखिल ट्रॅव्हल्सच्या एम एच ११ टी ९६९८ या बसने त्याच्या मार्गात आलेल्या स्विफटशी धडक टाळण्याचा प्रयत्नात डाव्याबाजुला असलेल्या इनोव्हाला ठोकर दिली व स्विफ्टलाही धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, तिन्ही गाडया रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेल्या सहा फुट खोल खड्यांत जावून कोसळल्या.
या दुर्देवी भीषण अपघातात सुमारे १७ जण जागीच ठार झाले. अपघातातील प्रवासी सातारा, मुंबईचे रहिवासी आहेत. घटना स्थळी रक्ताचा सडा पडला आहे.दरम्यान, जखमी झालेल्या प्रवाशांना पनवेल कळंबोली येथील एमजीएम पेनासिया गांधी , लाईफ लाईन पनवेल , अष्टविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील जखमींची नावे
१ प्रविण खोपडे - भांडुप
२ जगन्नाथ दळवी - अंधेरी
३ सुनिल डिगे - सातारा
४ ओम डिगे - सातारा
५ रितेश चव्हाण - जोगेश्वरी
६ निलेश नाळे - ठाणे
७ निशा यादव - सातारा
८ सागर पाटील - घनसोली
९ विपिन म्हात्रे - घनसोली
१० सिध्देश कदम - ठाणे
११ राम अपनाथ - ठाणे
१२ ओमकार मानगोळी - ठाणे
१३ ओमकार साळुंखे - लोणंद
१४ अनिता निकम - सातारा
१५ मनोहर बुजाहर - सातारा
१६ योगेश खराडे - सातारा
१७ अक्षय गुजर -सातारा
१८ श्रुती शिवतंग -सातारा
१९ सुनिल गोडसे - दिवा
२० सोनल गोडसे - दिवा
२१ आर्या बहादपुर् - ठाणे
२२ निर्मा मोहिते -
२३ अविनाश कारडे - भांडुप
२४ प्रकाश गायकवाड - कळवा
२५ अश्विनी माहिती - कल्याण
२६ सुषमा शिवनकर - सातारा
२७ संगिता गोडसे -दिवा
२८ सुनिल गोडसे -दिवा
12 people died after accident between a bus and a car on Mumbai-Pune Expressway, injured taken to hospital pic.twitter.com/9ZVraNfdn5— ANI (@ANI_news) June 5, 2016