शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली 5 उमेदवारांची यादी; पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 12:21 PM

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मुंबई: सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची धुम सुरू आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. त्यानंतर 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होईल. यासाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

पंकजा मुंडेंना पुन्हा हुलकावणीदरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. पण, गेल्या काही निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात आले. यंदाही त्यांच्या नावीची जोरदार चर्चा होती, पण त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता पंकजा मुंडे यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

'पंकजांसाठी पक्षाने वेगळा विचार केला असेल'आज भाजपने यादी जाहीर केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उमेदवारांची नावे सांगितले. त्यांना यावेळी पंकजा मुंडेंबाबत विचारण्यात आले, त्यावर ते म्हणाले की, 'विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे निर्णय केंद्र सरकार घेते. केंद्राने घेतलेला निर्णय हा सर्वांनी शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो. आमच्या पक्षात आम्ही कोरी पाकीटे असतो, पक्षश्रेष्ठी उमेदवारीबद्दल ठरवत असतात. पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. पण, कदाचित पक्षाने त्यांच्यासाठी भविष्यातला दुसरा विचार केला असेल,' असे ते म्हणाले.

'भाजपची नाराजी क्षणभर असते'

जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त करणे, अपेक्षा व्यक्त करणे आणि इच्छित गोष्ट न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात काहीही गैर नाही. पण, भारतीय जनता पक्षातील नाराजी म्हणजे पाण्यातील जहाज क्रेनने उचलल्यावर पडणारा खड्डा असतो, तो एका क्षणात पाण्याने भरला जातो, तशी आहे. भाजपमधील नाराजी त्या पाण्यातल्या खड्ड्याप्रमाणे आहे, ती क्षणभर असते. कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी इच्छा व्यक्त करणे, अपेक्षा व्यक्त करणे, चुकीचं नाही. पंकजा मुंडे सध्या भाजपच्या राष्ट्रीच सरचिटणीस आहेत, मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्यांच्यासाठी पक्षाने आणखी काही विचार केला असेल, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकPankaja Mundeपंकजा मुंडेchandrakant patilचंद्रकांत पाटीलPrasad Ladप्रसाद लाडpravin darekarप्रवीण दरेकर