शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

Sadabhau Khot: सहाव्या जागेसाठी सदाभाऊंनी दाखल केला अर्ज, चंद्रकांत पाटील म्हणाले- 'आमचा त्यांना पाठिंबा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 2:12 PM

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना भाजपने जाहीर समर्थन दिले आहे.

मुंबई- राज्यसभेनंतर आता राज्यातील विधानपरिषद निवडणुकांमध्येही चुरस वाढली आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठीही ऐनवेळी सहावा उमेदवार देत महाविकासआघाडी सरकारसमोर आव्हान निर्माण केले आहे. या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना भाजपने जाहीर समर्थन दिले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. 

'सहा उमेदवार निवडून येणार'विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने खेळी खेळल्याचे चित्र आहे. सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपचा पाठिंबा आहे. त्यांना भाजपकडून पूर्ण समर्थन मिळेल. भाजपचे पाच आणि अपक्ष एक असे आमचे सहा उमेदवार निवडून येतील', असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

'सदाभाऊ शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय'पाटील पुढे म्हणाले की, 'सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले नेते आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक लढे उभे केले आहेत, शेतकऱ्यांसाठी त्यांचे काम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना आमदार मतदान करतील', असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

सदाभाऊंचा उमेदवारी अर्ज दाखलभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळी खोत यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्याआधीच सदाभाऊ खोत विधानभवनात पोहोचले आणि त्यांनी उमा खापरे यांच्यासोबत विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला. खोत यांना सहाव्या जागेसाठी मैदानात उतरवून भाजपने लढत कडवी केली आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Vidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटील