जळगाव - विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेने २, काँग्रेसने २, राष्ट्रवादीने २ आणि भाजपाने ५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यात प्रत्येक मताला बहुमूल्य किंमत आहे. दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यात जळगावचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी सांगितले तर एकनाथ खडसेंना मतदान करू असं विधान केले आहे.
एकनाथ खडसे यांचे पक्के राजकीय वैरी अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे तसेच वरिष्ठ नेत्यांचे आदेश आले तर एकनाथ खडसे यांनाही मतदान करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. मी अपक्ष आमदार असलो तरी शिवसेनेच्या विचाराने वाढलो आहे त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्याप्रमाणे मी मतदान करेन, यात मी एकनाथ खडसे असो की इतर कुणी असो त्यांना मतदान करेन अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
तसेच खडसेंशी राजकीय तसेच व्यक्तिगत मतभेद आहेत. अपक्ष आमदार असलो तरी मी शिवसेनेच्या विचारांनी वाढलो आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्या उमेदवाराला मत देऊ मग एकनाथ खडसे असो की इतर कुणी त्याला आपण मतदान करू असं आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. आमदार चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे हे एकमेकांचे पक्के राजकीय वैरी समजले जातात. दोघांकडून एकमेकांवर नेहमी आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी या झडत असतात. त्यातच आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चांना आलं आहे.
एकाच मतदारसंघात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसेच आमदार चंद्रकांत पाटील हे एकमेकांचे पक्के राजकीय वैरी असल्याचे सर्वश्रुत आहे. तर दुसरीकडे नुकत्याच विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांचं नाव निश्चित करण्यात आल आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार आहे. त्यामुळे ते कोणाला मतदान करणार याबाबत प्रश्न विचारला असता मी अपक्ष आमदार असलो शिवसेनेच्या विचाराने वाढलो आहे त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्यांच्या आदेशाप्रमाणे तरी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते तसेच शिवसेनेतील वरिष्ठ नेते जो आदेश देतील ज्यांना मतदान करावयाचे सांगतील त्यांना मी मतदान करणार आहे. यात वरिष्ठांनी सांगितलं की एकनाथ खडसे यांना मतदान करा तर राजकीय वैर व व्यक्तिगत मतभेद असले तरी मी त्यांना मतदान करेन असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केल आहे.