नवी मुंबई- मुंबई शिक्षक मतदार संघातून लोकभारतीचे कपिल पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मोठी आघाडी घेत विजय मिळवास तर मुंबई पदवीधर मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस हे विजयी झाले आहेत.
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरू आहे. नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू करण्यात आली आहे.
कोकण पदवीधरमधील मतदारांची संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी मतमोजणी सुस्थितीत व वेगाने होण्यासाठी 28 टेबल्स मांडण्यात आले आहेत. 78 सदस्यीय विधान परिषदेत सात मतदारसंघ हे पदवीधर तर सात मतदारसंघ हे शिक्षकांसाठी राखीव असतात. एकूण 14 आमदार हे पदवीधर व शिक्षकांमधून निवडून येतात. 30 आमदार हे विधानसभेतून निवडले जात असून, इतर 22 सदस्य हे स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. 12 सदस्य हे राज्यपाल नियुक्त करतात.याशिवाय या वेळेस काही सूक्ष्म निरीक्षकदेखील मतमोजणीवर लक्ष ठेवून असणार आहेत. पसंतीक्रम पद्धतीचे मतदान असल्याने उमेदवाराला विजयी होण्यासाठी विशिष्ट फॉर्म्युलाद्वारे आवश्यक कोटा निश्चित करण्यात येतो त्यानुसार सर्व उमेदवारांना मिळालेली मते मोजली जातात. मुंबई शिक्षक मतदारसंघात 8 हजार 353 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 82.12 आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात 37 हजार 237 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 52.81 तर कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 75 हजार 439 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 72.35 आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात 49 हजार 742 एवढे मतदान झाले असून, त्याची 92.30 टक्केवारी आहे.मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांना मतदान करता यावे, यासाठी शाळांना विशेष सुट्टी देण्यात आली होती. मात्र शाळांमधून शिक्षकांकडे रजेचा अर्ज मागितला जात असल्याच्या तक्रारी शिक्षक परिषदेकडे आल्या आहेत. म्हणून 25 जून रोजीची ‘विशेष सुट्टी’ असल्याने शिक्षकांची रजा कापण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे बुधवारी केली आहे. मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातही शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात 'टफ फाइट' होऊ शकते.
- 'कोकण पदवीधर'मध्ये काँटे की टक्कर
निरंजन डावखरे - भाजपा संजय मोरे - शिवसेनानजिब मुल्ला - राष्ट्रवादी
- 'मुंबई पदवीधर'मध्ये महामुकाबला
विलास पोतनीस - शिवसेनाराजू बंडगर - स्वाभिमान पक्ष पुरस्कृत उमेदवारराजेंद्र कोरडे - शेकाप (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा)जालिंदर सरोदे - शिक्षक भारतीदीपक पवार - अपक्ष
- मुंबई शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढाई
कपिल पाटील - शिक्षक भारती (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा)शिवाजी शेंडगे - शिवसेनाअनिल देशमुख - भाजपा
- 'नाशिक शिक्षक'मध्ये घराणेशाही
किशोर दराडे - शिवसेना (विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडेंचे भाऊ)अनिकेत पाटील - भाजपा (माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव)संदीप बेडसे - महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी