- राजेश शेगाेकारअकाेला : अकाेला, वाशीम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालात नवीन विक्रम घडला आहे. भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी तब्बल तिन वेळा विजयी झालेल्या शिवसेनेच्या गाेपीकिशन बाजाेरिया यांचा १०९ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. खंडेलवाल यांच्या विजयात महाविकास आघाडीचे फुटलेली मते माेलाची ठरली आहेत. खंडेलवाल यांना ४४३ तर बाजाेरिया यांना ३४३ मतं मिळाली. तर ३१ मतं अवैध ठरली.
खंडेलवाल यांचा विजय या मतदारसंघासाठी नव्या विक्रमाची नाेंद करणारा ठरला आहे. हा मतदारसंघ १९८८ पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात हाेता तर शिवसेनेचे उमेदवार गाेपीकिशन बाजाेरिया यांची तिसरी टर्म सुरू हाेती. त्यामुळे बाजाेरिया व शिवसेना यांचा सलग विजयाच्या नव्या विक्रमाला खंडित करत भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी विजयाचे कमळ फुलविले तसेच बाजाेरिया यांच्यासारख्या दिग्गजाला पराभूत करण्याच्या विक्रमाची नाेंद हाेईल.अकाेला, वाशीम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गत चारही निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रित हाेती. यावेळी मात्र युती दुभंगली असल्याने, भाजपने ताेडीस ताेड उमेदवार देऊन मतदारसंघात चुरस वाढविली हाेती. अकाेला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत विखुरलेल्या या मतदारसंघांत शिवसेनेकडे कधीही मतदारांचं बहुमत राहिलेले नाही. तरीही विद्यमान आमदार गाेपीकिशन बाजाेरीया यांनी विजयाचा ‘चमत्कार’ घडवून आला हाेता या पृष्ठभूमीवर यावेळी मात्र त्यांची चांगलीच दमछाक झाली. तर भाजपचे खंडेलवाल यांनी ही निवडणूक अतिशय शांतपणे अन् मुत्सद्दीगिरीने लढली. शेवटच्या दिवसापर्यंत दाेन्ही उमेदवारांनी आपल्या पत्त्यातील ‘अर्थ’ मतदारांना सांगितला नव्हता, ऐन वेळी खंडेलवाल यांनी ‘आकडयांच्या’ गणितात बाजाेरिया यांना जेरीस आणल्याची चर्चा आहे.
बाजाेरिया विजयापासून ‘वंचित’वंचित बहुजन आघाडीने दाेनपैकी एकाही उमेदवाराला अधिकृत पाठिंबा दिला नव्हता. मतदारांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीनुसार मतदान करावे, असे आदेश वंचितच्या नेतृत्वाने दिले हाेते. त्यामुळे वंचितचा काैल काेणाकडे झुकला, हा प्रश्नच हाेता दरम्यान, या निवडणुकीच्या निकालात वंचितचे बहूतांश मतदार हे भाजपकडे झुकल्याचे दिसून आले. या निवडणूकीच्या दरम्यानच अकाेला जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविण्यात यावी, अशा मागणीचे पत्र वंचितचा सत्तापक्ष वगळता विरोधी गटाच्या २९ सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सादर केले होते. त्या पत्रावर जिल्हा परिषदेतील भाजपच्या पाच सदस्यांच्याही स्वाक्षऱ्या होत्या, परंतु त्या पत्रावरील आमच्या स्वाक्षऱ्या ग्राह्य धरण्यात येऊ नये, असे पत्र भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने अध्यक्षांना देण्यात आले. ही घडामाेड पाहता, वंचितचा कल भाजपकडे झुकला असावा, अशी चर्चा आहे.
अंतर्गत गटबाजीचा फटकामहाविकास आघाडीतील घटक पक्षातच कायम धुसफूस आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा देत, या आधीच स्थानिक स्तरावर वेगळी चूल मांडली हाेती. दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा याच मतदारसंघात सलग चौथ्यांदा पराभव झाला हाेता त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसही आपल्या घडयाळाचे काटे काेणत्या दिशेने फिरवेल यांची शंका हाेती.या साेबतच शिवसेनेतच अंतर्गत गटबाजी चांगलीच जाेर धरली आहे. या गटबाजीचाही फटका शिवसेनेला बसला. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची मते फुटल्याचे निकाल स्पष्टपणे दर्शवत आहे.
असे हाेते मतदार-भाजप २४६काँग्रेस १९१शिवसेना १२४राष्ट्रवादी ९१वंचित ८६एमआयएम ७अपक्ष व इतर आघाडी ७७