Vidhan Parishad Election: हा तर असंवेदनशीलतेचा कळस; काँग्रेसच्या आक्षेपावर देवेंद्र फडणवीस संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 04:42 PM2022-06-20T16:42:51+5:302022-06-20T16:43:18+5:30

काँग्रेसने घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकारी १०० टक्के फेटाळेल असा दावाही संजय कुटे यांनी केला आहे.

Vidhan Parishad Election: This is the peak of insensitivity; Devendra Fadnavis target on Congress | Vidhan Parishad Election: हा तर असंवेदनशीलतेचा कळस; काँग्रेसच्या आक्षेपावर देवेंद्र फडणवीस संतापले

Vidhan Parishad Election: हा तर असंवेदनशीलतेचा कळस; काँग्रेसच्या आक्षेपावर देवेंद्र फडणवीस संतापले

googlenewsNext

मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी २८५ आमदारांनी मतदान केले. त्यात भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक आजारी असताना मतदानाला आले. परंतु या दोन्ही आमदारांच्या मतदानावर काँग्रेसनं आक्षेप घेतला असून याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यावर भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

याबाबत भाजपा नेते संजय कुटे म्हणाले की,  राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी दोघांनीही मतदानावर आक्षेप घेतले होते. या निवडणुकीत भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मतदान केले होते. परिस्थिती बिकट असताना दोन्ही आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु महाविकास आघाडीने खालच्या पातळीचं राजकारण सुरू केले आहे. काँग्रेसनं या दोघांच्या मतदानावर आक्षेप घेतला ते दुर्देवी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच काँग्रेसने घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकारी १०० टक्के फेटाळेल असा दावाही संजय कुटे यांनी केला आहे. तर काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसनं  असंवेदनशीलतेचा कळस गाठला अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र राज्यसभेला त्यांनी मतदान केले होते. विधान परिषदेत त्यांच्यामार्फत प्रतिनिधींकडून मतदान करण्यात आले. भाजपाने इतक्या त्रासातून त्यांना मतदानासाठी आणायला नव्हतं पाहिजे. त्यामुळे भाजपानं सहानुभूती दाखवायला हवी होती असं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षांनी एकमेकांना मदत केली आहे. काँग्रेसकडून मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आले. या दोन्ही आमदारांच्या वतीने दुसऱ्या माणसाने मतदान केले. हे दोन्ही आमदार सही करू शकत होते मग मतदानाला दुसऱ्याला का पाठवले? यावर निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतला आहे. त्यांच्यावर निर्णय होईल असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. तर राज्यसभेत या आमदारांनी कसं मतदान केले, आता कसे मतदान झाले याबाबत माहिती नाही. काँग्रेसनं आक्षेप घेतला असेल तर निवडणूक आयोग त्यावर निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.  

Web Title: Vidhan Parishad Election: This is the peak of insensitivity; Devendra Fadnavis target on Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.