शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विधान परिषद निवडणूक: भाजपच्या पळवापळवीवर तिन्ही पक्षांची करडी नजर, शिवसेना आमदारांना ताकीद

By यदू जोशी | Published: June 18, 2022 12:34 PM

Vidhan Parishad Elections 2022: विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने भाजपकडून आमदारांची पळवापळवी केली जाऊ शकते, हे गृहित धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांवर नजर ठेवणे सुरु केले आहे.

- यदु जोशीमुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने भाजपकडून आमदारांची पळवापळवी केली जाऊ शकते, हे गृहित धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांवर नजर ठेवणे सुरु केले आहे. ते कोणाच्या संपर्कात आहेत, याची माहिती गुप्तपणे घेतली जात आहे. शिवसेनेच्या आमदारांना तर माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या गळाला लागू शकतात. त्यांना भाजपकडून कोणी संपर्क केला का, त्यांचे कोणाशी बोलणे झाले का यावर लक्ष ठेवले जात आहे. राज्यसभेत काही आमदार क्रॉसव्होटिंग करू शकतात अशी चर्चा होती. प्रत्यक्षात तसे झाले नसले तरी ते आमदार प्रामुख्याने रडारवर आहेत. मोबाइलचा वापर अगदी अत्यावश्यक कॉल्ससाठीच करा, असे बजावले जाणार आहे. 

पीएला सोबत नेऊ नकाशिवसेनेच्या आमदारांना वर्षा निवासस्थानी बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले नाही. ते अन्य कार्यक्रमात व्यग्र होते, असे समजते. खा. विनायक राऊत यांनी आमदारांना सूचना केल्या. आगामी तीन दिवसांत माध्यमांशी बोलायचे नाही. हॉटेलवर कोणत्याही नातेवाइकास वा पीएला सोबत न्यायचे नाही, असे त्यांनी बजावले. 

मुक्काम हॉटेलांमध्येशिवसेनेचे आमदार शुक्रवारी पवईतील हॉटेलकडे रवाना झाले. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदारही शनिवारपासून वेगवेगळ्या ठिकाणी असतील. काँग्रेसच्या आमदार शनिवारी विधानभवनात येऊन हॉटेलवर जातील. 

संशयाच्या  घेऱ्यात कोण?- काँग्रेसचे विदर्भातील ३, मराठवाड्यातील २ तर उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचा १ आमदार भाजपकडे झुकू शकतात हे लक्षात घेऊन त्यांच्यावरच लक्ष आहे. - शिवसेनेच्या मराठवाड्यातील २, उत्तर महाराष्ट्र, मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी एकाच्या हालचाली टिपल्या जात आहेत. - गेल्यावेळी मतदानाला येताना आढेवेढे घेणाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या तीन आमदारांवर पाळत आहे.- राज्यसभेच्या वेळी गडबड करणाऱ्या मविआ समर्थक अपक्ष आमदारांवरही पाळत आहे. - तिकडे खुद्द भाजपचेही दोन आमदार संशयाच्या घेऱ्यात आहेत. 

मलिक, देशमुख यांना मतदानाचा अधिकार नाहीचकोठडीत असलेले बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. त्यामुळे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. - वृत्त/महाराष्ट्र

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपा