शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"
2
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
3
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
4
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
5
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
7
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
8
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
9
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
12
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
13
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
14
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
15
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
16
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
17
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
18
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
19
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
20
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

विधान परिषद निवडणूक: भाजपा, राष्ट्रवादीने राखल्या, सेनेने मिळवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:02 AM

वैयक्तिक संबंध मतांची फाटाफूट व लक्ष्मीदर्शन यांमुळे काहीसे वेगळे चित्र निकालांत पाहायला मिळाले.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या सहा पैकी पाच निवडणुकांचे निकाल गुरुवारी लागले. हे निकाल अनपेक्षित म्हणता येतील, असे नव्हते. पण वैयक्तिक संबंध मतांची फाटाफूट व लक्ष्मीदर्शन यांमुळे काहीसे वेगळे चित्र निकालांत पाहायला मिळाले. भाजपा सोबत नसताना शिवसेनेने दोन जागा मिळवल्या आणि भाजपा व राष्ट्रवादीने आपले गड कायम राखले. काँग्रेसच्या वाट्याला अर्थातच भोपळा आला, हे या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. लातूर-उस्मानाबादचा निकाल काय लागतो, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निकालांचे हे मतदारसंघनिहाय विश्लेषण.कमळाच्या साथीने अनिकेत तटकरे विजयीरत्नागिरी : शिवसेनेवर नाराज असलेल्या भाजपने केलेल्या मदतीमुळे राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांना तब्बल ३१४ मतांनी पराभूत केले. एकूण ९३८ मतांपैकी ६२0 मते तटकरे यांना तर ३0६ मते शिवसेनेचे राजीव साबळे यांना मिळाली. १२ मते बाद झाली. ३१४ मतांच्या आघाडीने तटकरे यांनी जागा कायम राखली.विधान परिषदेसाठी शिवसेना आणि भाजपने युती केली होती. काँग्रेस, स्वाभीमान व शेकाप यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. कागदावर युतीची मते अधिक होती. मात्र पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसमोर उमेदवार उभा केल्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी होती व भाजपची मते राष्ट्रवादीला जाणार असल्याची चर्चा होती. या निवडणुकीत शिवसेनेची मते कायम राहिली असून, उर्वरित सर्वच मते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याचे स्पष्ट होते. इथे शिवसेनेची ३0३ मते होती तर भाजपची १६४ मते होती. मात्र प्रत्यक्षात शिवसेना उमेदवार साबळे यांना ३0६ मतेच मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्वत:ची मते १७४ इतकीच आहेत. उर्वरित ४४६ मते त्यांना इतरांच्या पाठिंब्यामुळे मिळाली आहेत. स्वाभिमान पक्षाचा वाटाही महत्त्वाचा आहे. खासदार नारायण राणे यांनी निवडणुकीआधीच अनिकेत तटकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता.काकांनंतर पुतण्याया मतदार संघात आधी अनिल तटकरे विजयी झाले होते. आता त्यांचा पुतण्या अनिकेत सुनील तटकरे विजयी झाले. त्यामुळे हा मतदार संघ काकांकडून पुतण्याकडे गेला आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक