शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
6
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
7
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
10
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
11
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
12
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
14
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
15
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
16
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
17
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
19
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
20
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार

Vidhan Sabha 2019: भाजप-सेना महायुतीपुढे ११४ बंडखोरांचे आव्हान!;अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 6:22 AM

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५,५४३ उमेदवारांनी नामनिदर्शनपत्रे दाखल केली होती.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या (सोमवार) शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीत बंडखोरी झाली असली, तरी बंडखोरांचे सर्वाधिक आव्हान महायुतीपुढे आहे. २७ मतदारसंघांत तब्बल ११४ बंडखोरांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात दंड थोपटले असून, त्यांना शांत करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी दिवसभर ‘हॉटलाइन’वर होते, तर ‘मातोश्री’वरून शिवसेनेच्या बंडखोरांशी संपर्क साधण्यात येत होता.

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५,५४३ उमेदवारांनी नामनिदर्शनपत्रे दाखल केली होती. पैकी ४,७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ‘ए-बी’ फॉर्म वाटपचा घोळ सुरू होता. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुखांना बंडखोरांना रोखण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

महायुतीत भाजप १६४ आणि शिवसेना १२४ असे जागा वाटप झाले आहे. यावेळी भाजपमध्ये आयात उमेदवारांची ‘मेघाभरती’ झाल्याने, या आयारामांना उमेदवारी देण्यासाठी स्वपक्षाच्या १८ आमदारांना नारळ द्यावा लागला आहे. उमेदवारी नाकारली गेलेल्या इच्छुकांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले आहेत. युती होईल की नाही, याबाबत परवापर्यंत शंका असल्याने शिवसेनेने २८८ मतदारसंघात तयारी केली होती. शिवसेनेला या ‘आगाऊ’ तयारीचाच फटका बसण्याची शक्यता आहे. कारण काही अपवाद वगळता शिवसेनेच्या बहुसंख्य उमेदवाराविरोधात शिवसैनिकांनी दंड थोपटले आहेत.

२०१४ ची निवडणूक भाजप-शिवसेनेने स्वबळावर लढविली. त्यामुळे दोन्ही पक्षांत सर्वच मतदारसंघात यावेळी इच्छुकांची भाऊगर्दी होती. महायुतीतील रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती या मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातून जागा दिल्याने नाराज स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बंडखोरीचे पाऊल उचलले आहे. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना आणि शिवसेनेच्या उमेदवारविरुद्ध भाजपचे बंडखोर असे चित्र आहे.या प्रमुख उमेदवारांसमोर बंडखोरांचे आव्हानमंत्री विजयकुमार देशमुख, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, मदन येरावार, आ. जयप्रकाश मुंदडा, आमजी आ. गोपालदास अग्रवाल, आ. सुजित मिणचेकर, आ. राजेश क्षीरसागर, आ. भीमराव तापकीर, महापैर मुक्ता टिळक, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. विजयराव औटी, आ. शिवाजी कर्डिले, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. राजेंद्र पाटणी, आ. सीमा हिरे, माजी आ. दिलीप सोपल या प्रमुख उमेदवारांविरोधात बंडखोरांनी आव्हान निर्माण केले आहे.बंडखोरांना मुख्यमंत्र्यांचा इशारा : ज्यांनी बंडखोरी केली आहे ते माघारही घेतील, पण जे घेणार नाहीत, त्यांचा दारुण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. बंडखोर आमचा असो की शिवसेनेचा, त्याला आधी समजावून सांगू अन् नाहीच ऐकलं तर त्याची जागा दाखवू, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.आघाडीतही बिघाडी :काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीतही काही ठिकाणी बिघाडी झाल्याचे चित्र आहे. विशेषत: सोलापूर जिल्ह्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी दिल्याचा राग म्हणून काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना भालकेंविरोधात उभे केले आहे, तर या खेळीला प्रत्युत्तर म्हणून शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्टÑवादीने जुबेर बागवान यांची उमेदवारी दाखल केली आहे. सोलापूरचा हा तिढा सुटला नाही, तर त्याचे पडसाद इतर मतदारसंघात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस