मुंबई : विधानसभा निवडणुकीत यावेळी प्रथमच महिला उमेदवारांनी त्रिशतक गाठले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीतल हा उच्चांक आहे. महिला मतदारांची संख्या, त्यांचे महत्त्व विचारात घेऊन राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यास प्राधान्य दिले आहे. याशिवाय महिलांनी मोठ्या प्रमाणावर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
२०१९ मध्ये काय चित्र होते?
१५५ मतदारसंघांत महिला उमेदवार २३९ होत्या.
१३३ मतदारसंघांत एकही महिला उमेदवार नव्हती.
२४ एवढ्या विक्रमी संख्येने महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या.
२,२१,६०० बॅलेट युनिटचा मतदानासाठी वापर केला जाईल. १८५ मतदारसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे.
१०० मतदारसंघ असे आहेत जेथे दोन बॅलेट युनिट लागणार आहे. तर ३ मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत.
३४ एवढे सर्वाधिक उमेदवार माजलगाव (जि. बीड) मतदारसंघात आहेत.
०३ एवढेच म्हणजे सर्वात कमी उमेदवार शहादा (जि. नंदुरबार) मतदारसंघात आहेत.