शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
5
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
6
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
7
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
8
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
9
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
10
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
11
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
12
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
13
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
14
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
15
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
17
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
18
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
19
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना

विजय कुवळेकर यांना लोमटे स्मृती पुरस्कार

By admin | Published: September 21, 2014 2:21 AM

यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीतर्फे दिला जाणारा दुसरा भगवानराव लोमटे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार लोकमतचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला.

 अंबाजोगाई (जि़ बीड) :   यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीतर्फे दिला जाणारा दुसरा भगवानराव लोमटे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार लोकमतचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला. रोख 25 हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आह़े  

व्यासपिठावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विद्यासागर पंडीत, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. रं. बोराडे, स्मृती समारोह समितीचे अध्यक्ष गिरीधारीलाल भराडिया, सचिव दगडू लोमटे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना कुवळेकर म्हणाले की, सर्वच क्षेत्रत सुर्यास्त जवळ आला की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकप्रबोधन दुरावत चालले. माणूस दुय्यम ठरत चाललाय. शिक्षण माणसाला माणूस बनवतो. ही संकल्पना मोडीत निघत आहे. अशा स्थितीत विधायक उपक्रम राबवून समाजाचे हित जोपासणारे व समाजावर संस्कार करणारे उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.
कुलगुरू विद्यासागर पंडीत म्हणाले की, समाजाचे प्रबोधन सातत्याने सुरू ठेवण्याचे काम पत्रकारितेतून होते. अभिसरणातून समाज प्रगल्भ होतो. असे सांगून माणसाचे मोठेपण इतरांसाठी उपयोगी याव़े  (प्रतिनिधी)