Walmik Karad :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:54 IST2025-01-02T10:50:09+5:302025-01-02T10:54:49+5:30
Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांना तपास वाढवला आहे. खंडणी प्रकरणी आरोप असलेला वाल्मीक कराड दोन दिवसापूर्वी सीआयडीकडे सरेंडर झाला.

Walmik Karad :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याचेही नाव समोर आले. दोन दिवसापूर्वी वाल्मीक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला. त्याचदिवशी बीडमधील कोर्टासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने वाल्मीक कराड याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. वाल्मीक कराड सध्या बीड येथील पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, वाल्मीक कराड बाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.
एकविरा देवीच्या मंदिर परिसरात फटाके फोडणे पडले महागात; मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेक भाविक जखमी
"मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, असा मोठा दावा वडेट्टीवार यांनी केला. वाल्मीक कराड याचा पोलिस एन्काऊंटर करु शकतात, असं वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, बीड मधील पोलिस ठाण्यात बेड घेऊन गेल्याचे फोटो समोर आले. याआधी पोलिस ठाण्यात बेडवर झोपल्याची माहिती नाही. कालच्या प्रकरणात पोलिसांसाठी असल्याच सांगितलं आहे. हे वाल्मीक कराडचे लाड आहेत. पोलिस कस्टडीमध्ये असताना त्याला झोपण्यासाठी घेऊन गेले आहेत का? या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
"मला तर विश्वसनीय लोकांकडून एक वेगळी माहिती मिळाली आहे. ती माहिती अशी आहे की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो. पोलिसांना विनंती आहे की, मोठ्या आकाला वाचण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटर करु नका. मोठ्या आकाचा जाण्यासाठी जर या छोट्या आकाराचा वापर होत असेल तर हा पुरावा नष्ट करण्यासाठी काहीही होऊ शकते, असा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.
'आज पहिल्या कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय व्हायला हवेत'
महायुती सरकारची आज पहिलीच कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ अशी घोषणा केली, आता आजच्या कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय घ्यावा. महायुतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्याची घोषणा केली. आज पहिल्याच कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय होतो का ते पाहावे लागेल.
'अनेक नेते अजूनही कोमातच गेले आहेत. अजून काही नेत्यांनी मंत्रिपदाचा चार्ज घेतलेला नाही. मंत्र्यांमध्ये खाते वाटपावरुन वाद आहे. यामध्ये राज्याचे वाटोळे होऊ नये, असंही वडेट्टीवार म्हणाले.