'खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा, नाही तर...', वडेट्टीवारांचा पडळकरांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 02:28 PM2021-09-06T14:28:08+5:302021-09-06T14:29:05+5:30
vijay wadettiwar slams gopichand padalkar: विजय वडेट्टीवारांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा गोपीचंद पडळकरांनी केला आहे.
नागपूर: भाजप आमदार गोपीचंद पडळकर(gopichand padalkar) यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(vijay wadettiwar) यांची छत्तीसगडमध्ये कंपनी असल्याचा दावा केला होता. त्यावर आता वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'तुला काय बोलायचं ते पुराव्यानिशी बोल.खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर', असा थेट इशाराच विजय वडेट्टीवारांनी दिला आहे.
https://t.co/f0ARqjLSDT
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
ही स्वदेशी बनावटीची 'INS ध्रुव' युद्धनौका शत्रूची क्षेपणास्त्रे, पाणबुड्या आणि उपग्रहांचे अचूक स्थान सांगण्यास सक्षम आहे.#indiannavy#insdhruv
विजय वडेट्टीवार आज माध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी पडळकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. याबाबत ते म्हणाले, 'पडळकरांनी पुराव्याअभावी आरोप करू नये. आता ते फक्त कार्यकर्ते राहिले नाहीत, आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करावे. नाही तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन, असा इशारा वडेट्टीवारांनी दिला.
https://t.co/IusuRQiwNA
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
तालिबानने शाळा-कॉलेजमध्ये मुलींना शिकण्यास परवानगी दिली आहे. पण, एक मोठी नियमावली जारी केली आहे.#Afghanistan#taliban
...तर मी राजकारण सोडेल
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, पडळकरांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे. त्यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल. माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दारुचे दुकानं नाही, छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. माझ्या आईने कष्ट करुन मला शिकवलं. ओबीसी चळवळीला बदनाम करण्याचं काम पडळकर करतात. सुपारी घेऊन चळवळ संपवण्याचं काम ते करत आहेत. पडळकर खरंच ओबीसींसाठी काम करणार असेल तर त्यांनी सोबत यावं. चंद्रशेखर बावनकुळे कधीही पातळी सोडून बोलत नाहीत. ओबीसींचं नुकसान होणार नाही ही माझी आणि बावनकुळेंची भूमिका आहे, असं ते म्हणाले.