शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

विजयाने मुख्यमंत्र्यांचे भाजपात वजन वाढले

By admin | Published: February 24, 2017 6:01 AM

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बरोबरीने मिळविलेला विजय, ठाणे वगळता अन्य आठ महापालिकांमध्ये

यदु जोशी / मुंबईमुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बरोबरीने मिळविलेला विजय, ठाणे वगळता अन्य आठ महापालिकांमध्ये दृष्टिक्षेपात आलेली सत्ता यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन वाढले आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपाला नंबर एकचा पक्ष केल्यानंतर आता महापालिका व जिल्हा परिषदांमध्येही फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठे यश मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वाला झळाळी मिळाली आहे. १९९१मध्ये नगरसेवक म्हणून महापालिकेत पाऊल ठेवणारे फडणवीस यांच्या लोकप्रतिनिधीपदाच्या कारकिर्दीला बुधवारीच २५ वर्षे पूर्ण झाली आणि गुरुवारच्या निकालांनी त्यांना विजयाची भेट मिळाली आहे. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा ‘दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ असे वर्णन करण्यात आले होते. गुरुवारच्या निकालानंतर त्या वर्णनाची शाई अधिक गडद झाली आहे. मुंबईच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला थेट अंगावर घेण्याची हिंमत आतापर्यंत भल्याभल्यांनी केलेली नव्हती. काँग्रेसचे बहुतेक मुख्यमंत्रीदेखील मुंबई जणू शिवसेनेची मक्तेदारी असल्याचे समजूनच निवडणुकीकडे पाहत असत. फडणवीस हे असे पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान दिले आणि भाजपाला शिवसेनेच्या बरोबरीने आणण्यात ते यशस्वी झाले. ‘भाजपाची औकात दाखवू’ आणि ‘परिवर्तन तर होणारच’ असे त्यांनी ठासून सांगितले. मुंबईकरांसमोर विकासाचा आणि पारदर्शकतेचा अजेंडा त्यांनी मांडला आणि राजकीय यशही पक्षाला मिळवून दाखविले. नागपूरचा गड भाजपाने राखला. तेथील दिग्गज नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सलोखा राखत बहुतेक सूत्रे त्यांनी गडकरींच्या हाती दिली आणि स्वत: राज्यातील इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. विशेषत: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यांनी मांडलेल्या विकासाच्या अजेंड्याला मतदारांनी पसंती दिल्याचे निकालावरून दिसते. ‘मी जिथेही प्रचाराला जातो तिथे लोकांना माझ्यामध्ये एक विश्वास असल्याचे जाणवत होते’ असे मुख्यमंत्री प्रचार संपल्यानंतर सांगत होते. निकालामध्येही तेच दिसून आले आहे. ‘माझा कोणताही गट नाही, तुमचाही तो नसावा, आपल्या सर्वांसाठी पक्ष हेच सर्वस्व असल्याचे सांगत त्यांनी भाजपांतर्गत गटबाजी राहणार नाही, याची काळजी घेतली. एकाच जिल्ह्यात पक्षाचे दोन दिग्गज नेते असतील तर एकाकडे महापालिका आणि दुसऱ्याकडे जिल्हा परिषदेची जबाबदारी देत त्यांनी दोघांमध्ये स्पर्धा लावली.सबकुछ ‘सीएम’महापालिका, जिल्हा परिषदांचे  उमेदवार ठरविण्यापासून प्रत्येक बारीकसारिक गोष्टीत फडणवीस यांनी ‘वर्षा’वर अक्षरश: रात्ररात्र जागून लक्ष घातले. गेले दीड महिना ते पहाटे तीनच्या आधी झोपले नाहीत. छोट्यांपासून मोठी सामाजिक समीकरणे, बेरजेचे राजकारण, मर्यादित ताकद असलेली पण त्या-त्या भागातील निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतील, अशी माणसे जाणीवपूर्वक पक्षात आणण्यापासूनच्या राजकीय खेळींवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले.